शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

Showing posts with label poem. Show all posts
Showing posts with label poem. Show all posts

Thursday, 1 June 2017

बळीराजाचा संप

आमचंच खाऊन भडव्यांनो
हात बुडाला पुसता काय..
आम्ही चाललोय संपावर
म्हणून आम्हाला हसता काय....

लक्षात ठेवा, या ठिणगीचा
जेव्हा कधी वणवा होईल
तेव्हा मात्र तुमच्यावर
घान खायची वेळ येईल,

घान केलीय तुम्हीच सारी
अन् आमच्या तोंडाला पुसता काय
आम्ही चाललोय संपावर
म्हणून आम्हाला हसता काय..

काल परवा कुणीतरी
पंढरपुरात बोललं
पर्यायी व्यवस्था उभारण्याचे
गुपित नवं खोललं...

कमी पडेल जे काही
त्याची आयात करणार म्हणे....

साहेब, जे करायचे ते करा
सत्ता तुमची गुलाम आहे
तुमच्या आयात निर्यातीला
आमचा आता सलाम आहे

वस्तू बाहेरुन आनता येईल
पण बाप आयात कराल काय
अन् निवडणूक आल्यावर
पाय त्यांचेच धराल काय..

असो....

साहेब, लाखो शेतकरी बापांनी
आत्महत्या केल्यायेत
आता उरलेल्यांना तरी जगू द्या
अन् आमच्या घामाचं मोल आता
आमच्याच खिशात उगू द्या...

हनुमंत चांदगुडे
 सुपे (बारामती)