शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

Saturday, 15 June 2019

7 वा वेतन आयोग फरक एक्सेल

नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो ,
आपल्या सर्वांना माहिती आहे अंशदान परिभाषित योजना अर्थात डीसीपीएस योजना लागू असणाऱ्या शिक्षकांसाठी सातव्या वेतन आयोगाचा फरक रोखीने देण्यात येणार आहे. यावर्षी 1 जुलै 2019 रोजी पहिला हप्ता जमा होणार आहे. त्यासाठी आपला एकूण फरक किती मिळणार आणि त्यातील पहिला हप्ता  किती जमा होईल याची आकडेमोड करण्यासाठी सदर एक्सेल तयार केलेली आहे. ही एक्सेल डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.



वरच्या बटणावर क्लिक करून डाउनलोड केलेली एक्सेल फाईल कशी वापरावी यासंदर्भातील मार्गदर्शक व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या युट्युब चिन्हावर क्लिक करा.

Friday, 14 June 2019

शालेय पोषण आहार 6.1

नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो !
मी या आगोदर तयार केलेले शालेय पोषण आहार एक्सेल सॉफ्टवेअर महाराष्ट्रातील असंख्य शिक्षक बंधू भगिनी वापरत आहेत, त्याबाबतचे आपले असंख्य अभिप्राय मी वाचले आहेत ! 

नवीन एक्सेल सॉफ्टवेअर 6.1 आपल्या हाती देताना विशेष आनंद होत आहे. हे सॉफ्टवेअर देखील आपल्याला खूप आवडेल अशी खात्री आहे. 

नवीन एक्सेल सॉफ्टवेअर 6.1 डाउनलोड करण्यासाठी व वापर करण्यासंधर्भातील महत्वाच्या सुचना वाचण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.

Friday, 3 May 2019

7 वा वेतन आयोग - सर्व विकल्प एक्सेल शिट

सर्व प्रकारच्या शिक्षकांना ( 1 जानेवारी 2016 नंतर ग्रपे बदललेला असो अगर नसो, प्रमोशन, चटोपाध्याय मिळालेले असो अगर नसो ), सर्व प्रकारचे विकल्प निवडता येतील अशा पद्धतीची एक्सेल शीट तयार करण्यात आलेले असून खाली दिलेल्या बटणावर क्लिक करून ती डाउनलोड करून घेता येईल.

अतिशय महत्वाचे-

ज्या दिवसाचा विकल्प आपण निवडत आहात, त्या दिवसाचेच बेसिक व ग्रेड पे INPUT ठिकाणी लिहावे. उदा. आपण 1 जुलै 2016 चा विकल्प निवडल्यास 1 जुलै 2016 चेच बेसिक व ग्रेड पे लिहावा.



Sunday, 24 March 2019

सातवा वेतन आयोग वेतन निश्चिती एक्सेल

सातव्या वेतन आयोगानुसार आपला पगार किती होतो तसेच फरक बीलाची रक्कम किती होईल हे पाहण्यासाठी दोन वेगवेगळ्या पद्धतीच्या एक्सेल शीट उपलब्ध करून दिल्या आहेत त्या वापरण्यासंदर्भातच्या सूचना व एक्सेल डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटनवर क्लिक करा.
( एक्सेल शीट वापरत असताना काही अडचण येत असल्यास आपली अडचण माझ्या 9011116046  या व्हाट्सअप नंबर वर पाठवावी, कृपया फोन करू नये. )

31 मार्च 2019 अखेर फरक बील काढण्यासाठीची एक्सेल डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. 




Tuesday, 19 February 2019

वरिष्ठ वेतनश्रेणी फरक बील एक्सेल

23/10 च्या शासन निर्णयानंतर महाराष्ट्रात सर्वप्रथम सांगली जिल्ह्यात वरिष्ट वेतनश्रेणी मंजूर करण्यात आली. यासाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन सांगली टीमने केलेले अथक परिश्रम आणि सांगली जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी मा. अभिजित राऊत साहेब यांचे अनमोल सहकार्य अतुलनिय आहे. वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ लगेचच येणार्‍या पगारात देण्यात येणार असल्याचे राऊत साहेबांनी आश्वासन दिल्याने 31 जानेवारी 2019 अखेर पर्यंतचे आपले फरक बील काढण्यासाठी शिक्षक बांधवांना बरीच धावपळ करावी लागणार आहे. नेमकी हिच अडचण ओळखून शिक्षक बांधवांना मदत करण्यासाठी फरक बीलाची ही शीट तयार करण्यात आलेली आहे. 

फरक बीलाची ही शीट डाऊनलोड करण्यासाठी तसेच वापर करण्यासंदर्भातील सूचना वाचण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा..

Monday, 10 September 2018

पैसे कमवा ई- वॉलेटमधून

नमस्कार मित्रांनो,
आजकाल डिजीटल व्यवहार करणार्‍यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. रिचार्ज, वीजबिल भरणे, डीटीएच रिचार्ज यासाठी आपल्याला दुकानात किंवा बँकेत जावे लागत नाही. त्यामुळे एक तर आपला वेळ वाचतो शिवाय घरबसल्या डिजीटल सुविधा वापरल्याचे समाधान देखील आपल्याला मिळते. यासाठी आपल्याला अनेक डिजिटल ई- वॉलेट माहित असतील. मी आज तुम्हाला अशा काही डिजीटल वॉलेटची माहिती सांगणार आहे की ज्याद्वारे व्यवहार करणे अत्यंत सोपे, सुरक्षित आहे. आणि जर आपण दुसर्‍यांना वॉलेट वापरण्यास प्रोत्साहित करत असाल तर त्या बदल्यात आपल्याला बक्षीस स्वरुपात काही रक्कम देखील मिळू शकते. चला तर मग पाहूया ई- वॉलेटमधून पैसे कसे कमावता येतात ते...

सविस्तर महितीसाठी खाली दिलेल्या Read More बटणावर क्लिक करा-



Sunday, 26 August 2018

पायाभूत चाचणी 2018-19 गुणनोंद व निकाल संकलन तक्ते

इयत्ता 2 री ते 8 वी संपूर्ण शाळेचा एकत्र निकाल तयार होणारे सॉफ्टवेअर मी तयार केलेले असून आपण वापरून पहा. हे सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.





इयत्ता 2 री ते ८ वी सर्व विषय गुणनोंद व शाळास्तर निकाल संकलन तक्ते एक्सेल व PDF फॉरमॅट मध्ये उपलब्ध आहेत.

एक्सेल तक्ते वापरण्याचे फायदे-

१) युनिकोड मध्ये असल्याने कोणत्याही संगणकावर वापरता येतात.
२) फक्त विद्यार्थ्यांचे प्रश्न निहाय गुण भरल्यास श्रेणी आपोआप निघते.
३) विद्यार्थ्यांचे लिंग निवडण्यासाठी Dropdown लिस्ट आहे, त्यातून योग्य ते लिंग निवडावे, त्यामुळे वर्गाचा श्रेणीनिहाय व लिंगनिहाय गोषवारा आपोआप तयार होतो.
४) प्रोटेक्ट केलेले नसल्याने आपल्या गरजेनुसार बदल करू शकता.
५) एका वर्गाच्या ९० विद्यार्थ्यांसाठी वापर करता येईल.
६) आपल्या वर्गातील विद्यार्थी जर ९० पेक्षा कमी असतील तर मध्ये रिकाम्या राहणाऱ्या सर्व रो सिलेक्ट करून डिलिट कराव्यात.

Thursday, 14 June 2018

वेळापत्रक व तासिका विभागणी

या आगोदर आपण 45 तासिकांचे वेळापत्रक वापरत होतो परंतु 28 एप्रिल 2017 नंतर एक सुधरित परिपत्रक आले. या परिपत्रकानुसार 48 तासिका होणे बंधनकारक आहे. सोमवार ते गुरुवार 8 तासिका, शुक्रवार 9 तासिका तर शनिवार 7 तासिका होणे बंधनकारक असून त्यानुसारच वेळापत्रक तयार करावे लागणार आहे. या सुधारित परिपत्रकाप्रमाणे विषयवार तासिका विभागणी व वेळापत्रक पाहण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.

Friday, 8 June 2018

शाळा सुरु होताना लागणारे कोरे फॉर्म

नविन शैक्षणिक वर्षाच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !!

या ठिकाणी शाळा सुरु होताच आपल्याला गरज पडणारे कोरे फॉर्म उपलब्ध करुन दिले आहेत. कोरे फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा. 


वर दिलेल्या बटणावर क्लिक करुन  शाळेत नाव दाखल करण्याचा नमुना, बोनाफाईड दाखला, दाखला मागणी, शिक्षकांसाठी किरकोळ रजेचा अर्ज, मुख्याध्यापकांसाठी किरकोळ रजेचा अर्ज, दीर्घमुदत रजेचा अर्ज, किरकोळ रजा तक्ता, पालकांचा प्रतिज्ञालेख, चार्ज देवाण घेवाण हे कोरे फॉर्म आपण डाऊनलोड करु शकाल.


Thursday, 7 June 2018

वार्षिक नियोजन- इ. 1 ली ते 8 वी

प्रत्येक वर्गशिक्षकासाठी आवश्यक असणारे वार्षिक नियोजन पीडीएफ स्वरुपात उपलब्ध आहे. डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.



( टीप ः इ. 1 ली व 8 वी वार्षिक नियोजन जुन्या अभ्यासक्रमाचे असून लवकरच नविन वार्षिक नियोजन अपलोड केले जाईल )