शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

Sunday, 28 May 2017

विद्यार्थी प्रमोट करणे विषयी


सूचना क्रमांक : १०४५
दिनांक: २४/०५/२०१७

Student पोर्टल मध्ये इयत्ता १ ते ८ वी च्या विद्यार्थ्याचे मॅन्युअली प्रमोशन करण्याची सुविधा सर्व  जिल्ह्यांसाठी उपलब्ध करून दिल्याबाबतची सूचना

सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांना सूचित करण्यात येत आहे की,सन 2016-17 हे शैक्षणिक वर्ष संपून सन 2017-18 सुरु झालेले आहे.आपल्या शाळेतील विद्यार्थी हे आता मागील इयत्तेमधून पुढील इयत्तेत गेलेले आहेत.student पोर्टल मध्ये मागील वर्षी  सर्व विद्यार्थ्यांचे सिस्टिम द्वारे ऑटो प्रमोशन केले होते.परंतु असे ऑटोप्रमोशन करताना काही अडचणी निर्माण झाल्याने या वर्षी आपल्या शाळेतील इयत्ता 1 ते 8 या वर्गातील विद्यार्थ्याचे प्रमोशन हे सिस्टिम द्वारे ऑटो न होता प्रत्येक शाळांनी हे प्रमोशन मॅन्युअली करावयाचे आहे हे लक्षात घ्यावे.

*सदर काम पूर्ण करण्यासाठी अंतिम मुदत ही 20 जून 2017 देण्यात आलेली आहे.


✏ इयत्ता 1 ते 8 या वर्गातील विद्यार्थ्याचे प्रमोशन कसे करावे याविषयीचे Manual (माहितीपत्रक) डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक ला क्लीक करा.

                                *लिंक*

                 https://goo.gl/RSzyXY

✏ तसेच इयत्ता ९ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्याचे प्रमोशन मागील वर्षी प्रमाणेच मॅन्युअली करावयाचे आहे.परंतु या प्रमोशन मध्ये देखील मागील वर्षीपेक्षा थोड्याफार प्रमाणात काही बदल केला गेलेला आहे.

✏ सध्या student पोर्टल मध्ये इयत्ता १ ते ८ वी च्या प्रमोशनची सुविधा देण्यात आलेली असून इयत्ता ९ वी ते १२ वी च्या प्रमोशनची सुविधा लवकरच देण्यात येणार आहे याची नोंद घ्यावी.जेंव्हा ही सुविधा देण्यात येईल त्यावेळी सर्वाना याबाबत सूचित करण्यात येईल हे लक्षात घ्यावे.

➡ इयत्ता 1 ते 8 वी च्या विद्यार्थ्याचे प्रमोशन करताना खालील बाबींची लक्षात घ्याव्यात.

✏ 1) प्रमोशन करण्यापूर्वी आपल्या शाळेतील कोणत्याही विद्यार्थ्याबाबत असलेली ट्रान्सफर संदर्भाजतील पेंडिंग काम पूर्ण करून घ्यावे.जसे की इतर शाळेतून आलेली ट्रान्सफर request approve/reject करणे किंवा आपल्या शाळेत ट्रान्सफर होऊन आलेल्या विद्यार्थ्यास update करणे. ही पेंडिंग कामे पूर्ण केल्याशिवाय आपणास प्रमोशन करता येणार नाही हे लक्षात घ्यावे.

✏ 2) प्रमोशन करताना मागील वर्गाच्या एका तुकडीचे पुढील वर्गाच्या तुकडीत प्रमोशन करावयाचे आहे.मागील वर्गातून पुढील वर्गात प्रमोशन करताना जर असे लक्षात आले की, मागील वर्गाच्या तुलनेत पुढील वर्गात कमी तुकड्या उपलब्ध आहेत.अशा वेळी पुढील वर्गात मागील वर्गात असलेल्या तुकड्या एवढ्या  तुकड्या तयार करून घ्याव्यात व त्यानंतर त्या त्या तुकड्यात विद्यार्थ्याचे प्रमोशन करून घ्यावे.

✏ 3) प्रमोशन करताना आपणास पुढील वर्गात जाणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या बाबतीत  तो प्रगत आहे की अप्रगत याबाबत नोंद करावयाची आहे.जरी तो अप्रगत असेल तरी अशा अप्रगत विद्यार्थ्याचे प्रमोशन करून घ्यावे. परंतु अशा विद्यार्थ्याच्या बाबतीत दरम्यानच्या काळात विद्यार्थ्यास अधिकचे अध्ययन अनुभव देऊन प्रगत करून पुढील वर्गात घेऊन जाणे क्रमप्राप्त असते. प्रमोशन मध्ये देखील अशा अप्रगत  विद्यार्थयांची नोंद घेऊन तो प्रगत झाल्यानंतर सिस्टिम मध्ये पुन्हा नोंद करावयाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे हे लक्षात घ्यावे.
  एखादा विद्यार्थी प्रमोशन करताना चुकीच्या तुकडीत अथवा चुकून प्रगत/अप्रगत अशी नोंद झाली तर असे झालेले प्रमोशन दुरुस्थ करण्याची सुविधा देखील देण्यात आलेली आहे.

अधिक माहितीसाठी आमच्या pradeepbhosale.blogspot.in  या ब्लॉग ला भेट द्या.

धन्यवाद !
प्रदीप भोसले
हवेली,पुणे
Mobile no. :9404683229

मातृत्व लाभ योजना

देशभरात मातृत्व लाभ कार्यक्रमाच्या अंमलबजावणीला मंत्रिमंडळाची मंजूरी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने देशभरात "मातृत्व लाभ कार्यक्रम (Maternity Benefit Programme)" च्या अंमलबजावणीला कार्योत्तर मंजुरी दिली आहे. हा कार्यक्रम आता देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये विस्तारित केला गेला आहे. १ जानेवारी २०१७ पासून देशातील सर्व जिल्ह्यात "मातृत्व लाभ कार्यक्रम" विस्तारीत केला गेला आहे.

गरोदर व स्तनदा महिलांना रोख प्रोत्साहन भत्ता देऊन महिलांचे या काळात होणारे वेतन नुकसानाची भरपाई करणे, जेणेकरून बाळाच्या जन्माआधी व जन्मानंतर पुरेशी विश्रांती घेऊ शकता येणार.

शिवाय गर्भधारणा आणि स्तनपान करवण्याच्या काळात तिला आरोग्य व पोषण सुधारण्यासाठी मदत होण्यासाठी आणि प्रसूतीनंतर बाळाच्या विकासामध्ये अतिशय महत्त्वाचे असलेले स्तनपान पहिल्या सहा महिन्यात व्हावे यासाठी ही मदत दिली जात आहे.

रुपये ६००० (३०००+१५००+१५००) चे रोख अनुदान पहिल्या दोन मुलांसाठी तीन हप्त्यांमध्ये देय केले जाते.थेट लाभ हस्तांतरण (DBT) पद्धतीने आधार क्रमांक जोडलेल्या वैयक्तिक बँक/ टपाल खात्यात रोख रक्कम जमा केली जाईल.

ही एक केंद्र शासन पुरस्कृत योजना आहे. यामागील खर्च सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश (विधीमंडळ सह) यासाठी केंद्र व राज्य सरकार यांच्यामध्ये ६०:४० याप्रमाणे वाटून घेतली जाईल, तर NER आणि हिमालयीन राज्यांसाठी ९०:१० प्रमाणात आणि केंद्रशासित प्रदेश (विधीमंडळ नसलेले) यांच्यासाठी १००% या प्रमाणे असणार आहे.

एकूण खर्च हा सन २०१६-१७ चा शिल्लक कालावधी आणि सन २०१७-१८ पासून ते सन २०१९-२० पर्यंत १२६६१ कोटी रुपये इतका होणे अपेक्षित आहे. एकूण खर्चापैकी भारत सरकारचा वाटा शिल्लक सन हा ७९३२ कोटी रुपये होणे अपेक्षित आहे.

बाळांना योग्य स्तनपान आणि महिलांना प्रसुतीच्या आधी आणि नंतर पुरेशी विश्रांती मिळावी यासाठी महिला व बाल विकास मंत्रालयाने राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याच्या कलम 4(b) च्या उपबंधानुसार "मातृत्व लाभ कार्यक्रम" नावाने गरोदर व स्तनदा मातांसाठी योजना तयार केलेली आहे.

पे-टीएमची पेमेंट्स बँक झाली सुरु


मोबाईलचा वापर करून खरेदी विनिमयाचे माध्यम पेटीएमने आपल्या पेमेंट्स बँकेची सुरुवात 23 मे 2017 पासून सुरू केली. ऑनलाईन व्यवहारासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नसून ग्राहकाला अकाऊंटमध्ये किमान बॅलन्स ठेवण्याचीही आवश्यकता नसलेली ही भारतातील पहिली बँक आहे. पेटीएमच्या पेमेंट बँकेचे डिझाईन देशात आर्थिक समावेशन साध्य करण्यात मदत करण्यासह अर्ध्या अब्ज भारतीयांना अर्थव्यवस्थेच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या पेटीएमच्या उद्दिष्टांशी सुसंगत आहे. कंपनीचे हेतू ग्राहकांना रोख व्यवहारांकडून डिजिटल पेमेंट्स इकोसिस्टममध्ये आणण्याचा आहे.

पेटीएम पेमेंट्स बँक खाते सुरूवातीस केवळ-आमंत्रण तत्त्वावर उपलब्ध असतील. पहिल्या टप्प्यात, कंपनी आपल्या कर्मचा-यांसाठी आणि सहकारिंसाठी बीटा बँकिंग ऍप्लकेशन तयार करेल. पेटीएम ग्राहक ऍप्लकेशनवर जाऊन आमंत्रणाकरिता विनंती करू शकतात.

याबाबत पेटीएम पेमेंट्स बँकेचे अध्यक्ष विजय शेखर शर्मा म्हणाले, आरबीआयने आम्हाला जगात एक नवीन मॉडेल बनविण्याची संधी दिली आहे. ग्राहकांचे पैसे सरकारी बाँडमध्ये सुरक्षित पद्धतीने राहणार आहेत आणि देशाच्या प्रगतीसाठी हे अतिशय फायद्याचे ठरणार आहे. या ठेवींना सुरक्षेचा कोणताही धोका नसेल.’
पेटीएम पेमेंट बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रेणू सत्ती यांनी सांगितले की, ’आम्ही पेटीएम पेमेंट बँक दाखल करताना अतिशय आनंदित आहोत आणि बँक सुविधेरहित ग्राहकांकरिता आर्थिक सेवा घेऊन आलो आहोत. आमची महत्वाकांक्षा भारतातील सर्वात विश्वसनीय आणि ग्राहक-अनुकूल बँक बनण्याची आहे. तंत्रज्ञानाच्या सामर्थ्याचा वापर करीत आम्हाला 2020 पर्यंत 50 कोटी भारतीयांची आवडीची बँक बनायचे आहे.’

कॅशबॅक मिळवा…

पेटीएम बँकेत निधी ठेवल्यास 4 टक्के व्याज देण्यात येईल. याचप्रमाणे बँक खात्यात 35 हजारापर्यंत रक्कम जमा केल्यास 250 रुपये कॅशबॅक मिळेल. ऑनलाईन व्यवहारांवर कोणतेही शुल्क लागू होणार नाही.

शासनाची ई - नाम योजना



पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याव्दारे 14 एप्रिल 2016 रोजी (डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिवस) राष्ट्रीय कृषी बाजार नाम (National Agricultural Marketing) योजनेअंतर्गत ई-मंडी (e-NAM) चे उद्घाटन करण्यात आले.

ई-नाम योजनेचा उद्देश -

शेतकर्‍यांना शेतमालाची योग्य किंमत प्राप्त करून देणे. ई-नाम योजनेचा फायदा केवळ शेतकर्‍यांनाच नव्हे, तर ग्राहक आणि घाऊक व्यापर्‍यांनाही घेता येईल.
 
ई-नाम योजनेमुळे शेतकरी व ग्राहक यांच्यामधील दलालांची मध्यस्थी कमी होण्यास मदत होणार आहे. ई-नाम योजना प्रयोगिक तत्वावर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगाणा, झारखंड, हरियाणा व हिमाचल प्रदेश या राज्यांतील 21 ठोक मंडी बाजारात शेतकरी आपल्या 25 कृषी उत्पादन वस्तू विक्री करू शकतील.

ई-नाम योजनेचे लक्ष्य

सरकारव्दारे मार्च 2018 पर्यंत देशातील 585 मंडी ई-मंडी जोडण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
 
ई-नाम योजना लागू केल्यानंतर शेतकर्‍यांना आपला माल कुठे विकावा, किती किमतीला विकावा हे ठरविण्याचा अधिकार मिळणार आहे. ई-नाम योजनेअंतर्गत मंडी बाजार हा ऑनलाईन करण्यात येईल.
 
ई-नाम योजनेअंतर्गत 1,60,229 शेतकरी, 46,688 व्यापारी व 25,970 कमिशन एजेंटंना अधिकृत करण्यात आले आहे. ई-नाम योजनेअंतर्गत पायाभूत सुविधा व प्रयोगशाळेच्या निर्मितीसाठी प्रति मंडी 30 लाख रुपयांची मदत रक्कम उपलब्ध करण्यात येईल.
 
ई-नाम योजनेअंतर्गत ई-नाम सॉफ्टवेअर व एका वर्षासाठी माहिती तंत्रज्ञान अधिकारी ही उपलब्ध करण्यात येतील.