शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

Thursday, 1 June 2017

आण्णा भाऊ साठे


शिवशाहीर विश्वरत्न अण्णाभाऊ साठे यांचा जन्म १ ऑग्स्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यात वाटेगाव या लहान गावात झाला करोडो विश्वे दारिद्र्ये असलेल्या अर्धवट भिंती व छत असलेल्या खुराड्यात झाला . असे हे अण्णाभाऊ साठे गरीब व निरक्षर पोर.
         गावाच्या शाळेत नाव घालण्यासाठी व दुसर्या दिवशी पहिल्याच प्रहरी ब्राम्हण शिक्षकाकडून  अपमानीत होण्यापुरता अण्णाभाऊंचा शाळा व शिक्षणाचा संबंध,तांत्रिक दुष्ट्या पूर्ण निरक्षर , अशा अण्णाभाऊंनी मराठी साहित्यातील लोकवाड्मय , कथा , नाट्य , पथ नाट्य , लोकनाट्य ,कादंबऱ्या ,चित्रपट , पोवाडे , लोकगीत ,लावण्या ,वग ,गवळण , प्रवास वर्णन , रेखा चित्र असे सर्वच साहित्य प्रकार सशक्त व समृद्ध केले . अण्णाभाऊंनी मुंबईत रिकाम्या पोटी मराठी माणूस उभा करून त्या मराठी माणसाला त्याची मुंबई संयुक्त महाराष्ट्र्रा सोबत परत मिळवून दिली .
         अण्णाभाऊंची एकूण पुस्तके / ग्रंथ संख्या ७७ आहे शिवाय त्यांचे काही साहित्य गहाळही आहे अण्णाभाउंनी छत्रपती शिवरायांचे चरित्र रशियापर्यंत पोवाड्यातून सांगितले. पुढे त्यांचे रशियन भाषेमध्ये भाषांतर झाले आणि रशियाच्या राष्ट्रपतीकडून त्याचा सन्मान देखील झाला.
             लोकनाट्यात गणामध्ये असणारी गणेश वंदना अण्णाभाऊंनी झिडकारून मातृभमिसह शिवरायांना वंदना असणारी परंपरा रुजू केली ती अशी

                                                                 '' प्रथम नमन मायभूच्या चरणा !
                                                                       छत्रपती शिवबा चरणा !
                                                                        स्मरोनी गातो कवना "!
                                                           
माझी मैना गावावर राहिली,माझ्या जीवाची होतीय काहिली " हे अतिसुंदर काव्य देखील त्यांनी लिहले आहे
१६ ऑगस्ट १९४७ साली " ये आझादी झुटी है देश की जनता अभी भूखी है !" असा नारा शिवाजी पार्क वर अण्णा भाऊंनी दिला. तेंव्हा त्या दिवशी रुद्ररूप धरण केलेल्या उभ्या पावसाची नोंद अद्याप देखील झाली नाही तरी देखील अण्णाभाऊ मागे हटले नाही.
              अण्णाभाऊंच्या वैजयंता ,माकडीचा माळ ,चिखलातील कमळ , वारणेचा वाघ , अतगुज ,फकीरा या सात कादंबऱ्या मराठी भाषेत निघालेले चित्रपट सुपरहिट ठरले . चार चित्रपटांना विविध पारितोषिके देखील मिळाली शुक्रवार दिनांक १८ जुलै १९६९ रोजी टिळा लावते मी रक्ताचा हा शेवटचा चित्रपट प्रसिद्ध होताच अण्णाभाऊ हि श्रमिकांची रंगभूमी कायमची सोडून गेले त्यांना केवळ ५० वर्षाचे आयुष्य लाभले या उलट , कुसुमाग्रज अर्थात विष्णू वामन शिरवाडकर हे पुण्यातील अत्यंत श्रीमंत घरातील होते त्यांचे पुण्यात व पुढचे उर्वरित शिक्षण मुंबई मध्ये पूर्ण झाले . पुढील आयुष्य त्यांनी अमराठी व स्वजातीच्या लोकांच्या हितासाठी खर्चकेले तसेच एकून १४ (कादंबरी , ललित लेख , कविता संग्रह , नाटक ) + अनुवादित बरेच लिखाण त्यांनी केले . पण कुठेही मराठी , भूमिपुत्र,संघर्ष ,श्रमकरी , कष्टकरी , शेतकरी यांच्या वास्तववादी व्यथा त्यांनी मांडल्या नाहीत .
               शिवाय त्यांना पेशवाई व ब्राम्हण शाहीचा फारच पुळका . पण खोट्या इतिहासकारांनी फुकटच्या अफवा पसरवून कुसुमाग्रजांनी आयुष्य भर मराठी ची सेवा केली असे सांगून सरकारकडून तो मराठी भाषा दिन म्हणून लागू करून घेतला . कुसुमाग्रजांना अण्णाभाऊंच्या तुलनेत प्रदीर्घ आयुष्य लाभून सुद्धा (८७वर्षे ) चार बोटावर मोजण्या इतक्या  साहित्यीकांशिवाय त्यांना कोणीच ओळखत नाही .
              … पण या पार्श्वभूमीवर अत्यंत प्रतिकूल व परंपरागत निरक्षर वातावरणात , वाईट -रुढ्या परंपरा जोपासणाऱ्या समाजात धर्मानेच शिक्षण - संपत्ती नाकारलेल्या समाजात , अज्ञान गरिबी हेच भांडवल असलेल्या कुटुंबात , शेकडो पिढ्या अक्षर ओळख नसलेल्या जातीत जन्माला येवून जगाला ज्ञानी व स्वावलंबी करणारे अण्णाभाऊ साठे यांनी कुसुमाग्रजापेक्षा लाखो पटीने लिखाण केले , मराठी भाषाच नव्हे तर प्रांत समृद्ध केला , पण ते कोणाही ब्राम्हण नव्हते एवढीच काय ती कमतरता .
                   म्हणून शिवरायांचे विचार रशियापर्यंत नेणारे व 'जग बदल घालूनी घाव मला सांगून गेले भीमराव " असे म्हणून डॉ . बाबासाहेब आंबेडकरांशी आमची वैचारिक नाळ जोडून देणारे मराठी साहित्य सम्राट, विश्वरत्न अण्णाभाऊ साठे  यांचा जन्म दिवस १ ऑग़स्ट हा खरा जागतिक मराठी भाषा दिन म्हणून आपण सर्वजण साजरा करूयात हा मराठी भाषा दिन प्रत्येक मूलनिवासी बहुजनांच्या घरा -घरात साजरा व्हावा , शिवरायांच्या तमाम मावळ्यांनी तो सणा सारखा साजरा करावा

शेवगा खा, सांधेदुखी पळवा !


भारतातील शेवग्याचे पीक मागील वर्षी एक्स्पोर्ट झाले. शेतकऱ्यांना चांगला भाव मिळाला . म्हणून या वर्षी पुन्हा शेतकर्यांनी गुणवत्ता पूर्ण शेवगा उत्पादन घेऊन बाजारात शेंगा उपलब्ध केल्या.

एक्स्पोर्ट ची मागणी तेव्हडिच आहे, पण उत्पादन चार पट झाल्याने बाजार भाव कोसळले. भारतीय ग्राहकाने त्याकडे पाठ फिरवली आहे.

एका बाजूला कॅलशियम कमतरता वाढून गुढगे दुखी, मणके दुखी, सांधे दुखी हे आजार लोकांमध्ये फोफावत चालले आहेत. तर त्यासाठी समुद्रातील शिम्प्ल्याचे कॅलशियम दळून तयार केले जाते व त्याच्या महागड्य गोळ्या लोक खाऊन किडनी स्टोन सारख्या दुसऱ्या आजाराला बळी पडत आहेत.

तर जनावरांचे कॅलशियम कमी झल्याने त्यांच्या आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत. दुधाची गुणवत्ता ढसाळली आहे. त्यामुळे लहान मुलांचे दात किडून जतांना दिसत आहेत.

आज बाजारात शेतकरी २ ते ५ रुपये किलोने शेवगा विकत आहे, तरी ग्राहक नाक मुरडत आहेत. शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळाला नाही, तर ते पुढे शेवग्याचे पिक घेणे थाबवतील. मग हाच शेवगा इसराईल मधून भारतात १५० ते २०० रुपये किलोने घेऊन येईल व तेव्हा तो लाईन लाऊन आपल्याला घ्यावा लागेल.

महिलांनी त्यांचे सुगरणीचे गुण शेवग्याचे पदार्थ तयार करून मुलांना त्याचे सूप करून द्यावे. आठवड्यातून किमान ३ ते ४ वेळा शेवगा आहारातून घेतला गेला पाहिजे. शेवग्याची शेंग भाजी, सूप, शेवग्याचे सरबत करून ते फ्रीझमध्ये थंड करून सरबत करून द्यावे.

शेवग्याची चटणी , शेवगा सूपचे पराठे, पापड, अश्या नाना गोष्टी करता येतील. ह्यासाठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यावा. त्याचे कोणाला मार्गदर्शन लागल्यास लोक ते द्यावयास तयार आहेत.

महाराष्ट्रातील जनतेने शेतकऱ्यांचा उत्साह वाढविण्यसाठी व स्वताचे कुटुंबाचे आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी बाजारातील वाढीव शेवगा विकत घेऊन सहकार्य करावे.

ज्या शेतकऱ्यांकडे जनावरे आहेत, त्यांनी शेवगा पाला व शेंगा वळून त्याची २५० ते ५०० ग्राम भुकटी जनावरांना खाऊ घालून दुधाची प्रत उंचावून स्वतासाठी ते वापरावे व इतरांना देखील ते सांगून ५ रुपये जादा दराने विकावे.

शेत मालाला योग्य दर मिळण्यासाठी व ते टिकवण्याची जबाबदारी हि शेतकर्याची एकट्याची नाही ती आपल्या सर्वांची आहे. निसर्ग उपचारात शेवग्याचे मोठे महत्व आहे. त्यापासून गजराच्या १० पट विटामिन अ मिळते. दुधाच्या १७ पट कॅलशियम मिळते.

केळीच्या १५ पट पोट्या- सियम मिळते, पालकाच्य २५ पट लोह व दह्याच्या ९ पट प्रोटीन मिळते. अशी परिस्थिती असताना ग्राहकाने पायावर धोंडा पडून घेऊ नये व शेतकर्यांनी पण हे पिक वाया न घालवता जनावरांसाठी पोषक तत्व म्हणून विचार करावा.

ज्या कुणाला वरील पदार्थ बनवायचे असल्यास त्यातील तज्ञ श्री *सतीश नेने* कोपरगाव ७५८८२९७३५७, व ८४११८८७००८!

गरज भासल्यास मला विचारावे त्या साठी मोफत मार्ग दर्शन आम्ही  ग्लोबल सोसायटी च्या वतीने मदतीस तयार आहोत.

शेंगांचा गर काढण्यासाठी त्या शिजून घेऊन त्याचा गर काढून वळवता देखील येतो. हे ओर्गानिक कॅल्सियम पचनास चांगले चालते. जास्थ पक्व शेंगा घेतल्यास त्यात जास्त कॅल्सियम मिळते. ते सावलीत वळून ठेवावे. एक्स्पोर्ट चे कारण : पाश्च्यात्य देशात जंग फूड मुळे हाडांचे विकार वयाच्या १५ पासूनच दिसत आहेत. हाडांचे झीजने कॅलशिम च्या कमतरता रोखण्यासाठी शेवगा वापर चालू झला आहे.

डॉ. ज्ञानेश्वर वाघचौरे
आंतरराष्ट्रीय शेती तज्ञ

तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्याने होणारे फायदे


1.हेल्दी स्किन
दररोज रात्री तांब्याच्या भांड्यात पाणी भरून ठेवावे आणि सकाळी फ्रेश झाल्यावर ते पिल्याने त्वचेशी संबधीत सर्व समस्या दूर होतात,त्याच बरोबर त्वचा,चेहरा उजळतो.

2.सांध्यांना आराम -
दररोज सकाळी संध्याकाळी तांब्याच्या भांड्यात पाणी प्याल्याने सांधे दुखी कमी होते,सांध्यांना मोठ्या प्रमाणात आराम मिळतो.

3.वजन कमी करण्यास सहाय्यभूत
दररोज सकाळी संध्याकाळी तांब्याच्या भांड्यात पाणी प्याल्याने शरीरातील एक्सट्रा फॅट कमी होतात आणि एक्सट्रा फॅटची वाढ न झाल्याने वजन वाढत नाही.

4.बॅक्टेरिया नष्ट होतात
तांब्यामध्ये अँटी बॅक्टेरिया गुण असतात,या मध्ये पाणी ठेवल्यास बॅक्टेरिया नष्ट होतात,आणि डायरिया,अतिसार,कावीळ यांचा धोका टळतो.

5.कॅन्सरचा धोका कमी होतो
तांब्याच्या भांड्यातील पाण्यामध्ये अँटी ऑक्सिडेंटस् पर्याप्त प्रमाणात असतात,जे कॅन्सरशी लढण्यात सहाय्यक ठरतात,त्यामुळे कॅन्सरचा धोका कमी होतो.

6.जखम ठिक होते
तांब्यामध्ये असलेले अँटी बॅक्टेरियल गुण जखम ठिक करण्यास मदत करतात,एखादी जखम झाल्यास रोज तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यावे.

7.थायरॉईडचा धोका कमी होतो
तांब्यामधील कॉपर थारोक्सिन हार्मोनला संतुलित ठेवते, त्यामुळे थायरॉईडचा धोका दूर होतो.

8.हृदय मजबूत होते
तांब्याच्या भांड्यात ८ ते १० तास ठेवलेले पाणी प्याल्याने कोलेस्ट्रॉल लेव्हल नियंत्रणात राहते आणि हृदय मजबूत होते.

9.अँसिडीटी नष्ट होते
तांब्याच्या भांड्यात कमीतकमी ८ ते १० तास ठेवलेले पाणी प्याल्याने शरीरातील अँसिडीटी आणि गॅस दूर होऊन पचनक्रिया ठिक राहते.

10.रक्त वाढण्यास मदत होते
तांब्याच्या भांड्यातील पाणी नियमित पिण्याने तांब्या मधील कॉपर रक्ताची कमतरता दूर करते,त्यामुळे अँनिमियाचा धोका टळतो.

30 मिनीट चालण्याचे ३० फायदे


जर आपण सकाळी लवकर ऊठुन ३० मिनीटे घराच्या बाहेर फिरायला जाण्याची तयारी ठेवत असाल तर प्रथम आपले अभिनंदन. !!
कारण आपण दिर्घायुष्यी आहार व आपण आजारी पडण्याचे प्रमाण नगण्य आहे. तर हा लेख नक्कीच वाचा.दररोज ३० मिनीटे चालण्याचे फायदे.
१. एक पैसाही खर्च न करता करता येणारा व्यायाम प्रकार
२. सर्वांना करण्यासाठी सहज, सोपा व्यायाम प्रकार
३. कोणत्याही प्रकारच्या साहित्याशिवाय करता येणारा व्यायाम प्रकार
४. शरीर तंदुरुस्त, चपळ ठेवण्यासाठी एकमेव व्यायाम प्रकार
५. सकाळी चालण्यामुळे सकाळच्या वातावरणातील शुध्द ऑक्सीजन चा शरीराला पुरवठा होतो.
६. हाडांच्या मजबुतीसाठी आवश्यक असलेले डि जीवनसत्व सकाळ्च्या कोवळ्या ऊनातून मिळते.
७. चालण्यामुळे एकाच वेळी शारीरिक व मानसिक व्यायामही होतो.
८. सतत काम करून तन-मनाला आलेला थकवाही चालण्यामुळे दूर होतो.
९. चालण्यामुळे तणाव आणि चिडचिडेपणा दूर होण्यास मदत
१०. चालण्यामुळे झोपही चांगली लागते.
११. मन एकाग्रतेसाठी व चिंतनासाठीही चालणे फायदेशीर ठरते.
१२. वजन कमी करण्यास मदत होते.
१३. चालण्यामुळे शरीरातील जास्तीचे उष्मांक जाळते.
१४. चालण्यामुळे शरीरातील चरबीचे प्रमाण कमी करते.
१५. दररोज एक तास चालल्यास संधिवाताचा त्रास कमी होऊ शकतो असं संशोधनातून समोर आलं आहे.
१६. चालण्यामुळे पचनक्रिया सुधारते, मलबध्दतेसारखे पचनाचे विकार कमी होतात.
१७. झपझप चालण्यामुळे हृदयाची गती व स्टॅमिना वाढतो .
१८. नियमित चालण्याची सवय असणारयांमध्ये ह्रदयविकाराने मृत्यु येण्याचे प्रमाण ५० टक्के पेक्षा कमी असते.
१९. नियमित चालणारयांची फुप्फुसाची कार्यक्षमता वाढते.
२०. नियमित चालण्यामुळे पाठीचे दुखणे, हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, श्वासाच्या त्रासावर नियंत्रण मिळवता येते.
२१. नियमित चालण्यामुळे चयापचय संस्था सुधारते. अंतस्त्रावी ग्रंथीचे कार्य सुधारते.
२२. हाडांची मजबुतीही चालण्यामुळे वाढते.
२३. नियमित चालण्यामुळे कंबर, मांड्या, पायाचे स्नायु मजबुत होतात.
२४. मोतीबिंदु ची शक्यता कमी होते.
२५. नियमित चालण्यामुळे काही विशिष्ट प्रकारच्या कॅन्सर पासुन बचाव.
२६. नियमित चालण्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबुत करण्यासाठी उपयोग.
२७. चालण्यातून नैराश्याची पातळी खाली येण्यास मदत तर होते.
२८. दररोज ३० मिनीटे नियमित चालण्यामुळे सरासरी आयुष्य ३ वर्षांनी वाढते.
२९. नियमित चालणे ही दीर्घायुष्याची गुरुकिल्ली आहे.
३०. चालण्याचा व्यायाम करण्याआड वय मात्रकधीही येत नाही. आपण आपल्य नव्वदीतही शरीर साथ देत असेल तर चालण्याचा व्यायाम करू शकता, मात्र झेपेल इतकाच!.

देशात प्रथमच नदीखालून बोगदा


हावडा ते कोलकाता दरम्यानच्या मेट्रो मार्गाला जोडणाऱ्या हुगळी नदीखालील दुहेरी बोगद्याचे बांधकाम पुढील आठवड्यात पूर्ण होणार आहे. देशातील हा पहिलाच नदीखालचा बोगदा ठरणार आहे. कोलकात्यातील रेल्वेच्या १६.६ किमी लांबीच्या पूर्व-पश्चिम मेट्रो प्रकल्पांतर्गत ५२० मीटर लांबीचा हा बोगदा तयार करण्यात आला आहे.

नदीखाली ३० मीटर खोल या बोगद्याची निर्मिती करण्यात आली आहे. यातील एक मार्ग पूर्वेकडे, तर दुसरा मार्ग पश्चिमेकडे जाणार आहे. हावडा आणि महाकरण मेट्रो स्टेशनदरम्यान ये-जा करणारे प्रवासी या बोगद्यात प्रवासादरम्यान फक्त एक मिनिटासाठी असतील. मेट्रो ट्रेन या बोगद्यातून ८० किमी प्रतितास या वेगाने धावणार आहे. १६.६ किमी लांबीच्या या मेट्रो प्रकल्पामध्ये १०.६ किमी लांबीचा बोगदा असून त्याचा ५२० मीटरचा भाग नदीखालून जाणार आहे. नदीखालून बोगदा तयार करण्यासाठी ६० कोटी रुपयांचा खर्च आला आहे; तर संपूर्ण मेट्रो प्रकल्पाचा खर्च सुमारे ९ हजार कोटी रुपये आहे.

नदीखालील बोगद्याच्या निर्मितीचे काम गेल्या वर्षी एप्रिलमध्ये सुरू झाले होते. पूर्व-पश्चिम मेट्रो ऑगस्ट २०१९मध्ये सुरू होणार आहे, अशी माहिती रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. आपत्कालीन स्थितीमध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी बोगद्यामध्ये पादचारी मार्ग तयार केले जाणार आहेत.

अशी असेल १ रूपयाची नवी नोट


भारतीय रिझर्व्ह बँकेकडून लवकरच एक रूपये मुल्याची नवी नोट चलनात आणली जाणार आहे. रिझर्व्ह बँकेने 30 मे रोजी यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक जारी केले. या पत्रकात म्हटल्याप्रमाणे भारत सरकारकडून एका रूपयाच्या नव्या नोटेची छपाई पूर्ण झाली आहे. नव्या नोटा चलनात आल्यानंतरही सध्या चलनात असलेल्या एक रूपयाच्या जुन्या नोटा वैधच राहणार आहेत. नवीन नोट पुढच्या आणि पाठच्या दोन्ही बाजुंनी गुलाबी आणि हिरव्या रंगाची असेल. या नोटेच्या दोन्ही बाजुंना केंद्रीय अर्थसचिव शक्तिकांता दास यांची स्वाक्षरी असेल. या नोटेवर ‘भारत सरकार’ या शब्दांबरोबरच एक रूपयाच्या नव्या नाण्याची प्रतिकृतीही असेल. तसेच भारतातील सर्व चलनी नोटांवरील ‘सत्यमेव जयते’ हे ब्रीदवाक्य नोटेवर छापण्यात आले आहे.

नोटेच्या अन्य भागावर महाराष्ट्रातील ‘सागर सम्राट’ या तेल उत्खनन केंद्राची प्रतिमा आहे. याशिवाय, नोटेवर ‘L’ हे अक्षर कॅपिटलमध्ये छापण्यात आले आहे. तसेच नोटेवर अशोक स्तंभाच्या प्रतिमेबरोबर ‘1’ ही संख्या आणि ‘भारत’ हा शब्द अदृश्य स्वरूपात छापण्यात आला आहे.

खासगी शाळेतही परीक्षेद्वारे भरती

आता परीक्षेद्वारे शिक्षक भरती, तावडेंचा ऐतिहासिक निर्णय
अमेय राणे, एबीपी माझा, मुंबई 30 May 20

मुंबई: राज्य सरकारकडून अनुदान मिळणाऱ्या खासगी शाळांमधल्या शिक्षक भरीतासाठी यापुढे परीक्षा घेतली जाणार आहे. तसंच मेरिटनुसारच शिक्षकांची भरती केली जाणार असल्याची माहिती शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिली.

सरकारच्या या निर्णयामुळं शिक्षक भरतीसाठी लाखो रुपये उकळणाऱ्या शिक्षण संस्थांना मोठा दणका बसणार आहे. शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती दिली.

राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या अनुदानित, अनुदानास पात्र ठरलेल्या आणि पात्र घोषित झालेल्या शाळांमधील शिक्षण सेवकांची भरती आता अभियोग्यता (ॲप्टीट्यूड) आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेच्या गुणांच्या आधारे करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज घेण्यात आला. यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील शिक्षण सेवकांच्या भरतीसाठी घेण्यात येणारी केंद्रीय भरतीपूर्व निवड चाचणी परीक्षा (CET) रद्द करण्यात आली आहे.

राज्यातील सर्व खाजगी अनुदानित, अनुदानास पात्र ठरलेल्या, अनुदानास पात्र असलेल्या शैक्षणिक व्यवस्थापनांच्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये शिक्षक भरती प्रक्रियेत सुलभता आणण्यासह गुणवत्तेवर शिक्षकांची निवड व्हावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

याअंतर्गत शिक्षण सेवक पदांच्या भरतीसाठी राज्यस्तरीय समान काठिण्य पातळी चाचणी परीक्षेचे आयोजन करण्यात येणार आहे. ही परीक्षा 200 गुणांची राहणार असून तिचे मराठी व इंग्रजी अशी दोन माध्यमे असतील.

इयत्ता पहिली ते आठवी मधील शिक्षक पदाकरिता महाराष्ट्र खाजगी शाळांमधील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, 1981 मधील शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण केलेले तसेच “शिक्षक पात्रता परीक्षा” (TET)  उत्तीर्ण उमेदवार परीक्षेस अर्ज करण्यास पात्र ठरतील.

या चाचणीत मिळालेल्या गुणाच्या आधारावर प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्था अथवा खाजगी शैक्षणिक संस्थांना गुणवत्तेनुसार उमेदवारांची निवड करावी लागणार आहे. या निर्णयानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांतर्गत आणि खाजगी शैक्षणिक संस्था यांना रिक्त पदे आणि आरक्षण विषयक बाबींच्या अंतर्भावासह संबधित संगणकीय प्रणालीवर किमान 15 दिवसांकरिता प्रसिद्ध करावी लागणार आहे. कोणत्याही वर्षी प्राप्त झालेले चाचणीचे गुण कोणत्याही वर्षाच्या निवड प्रक्रियेसाठी पात्र राहणार आहे.

अभियोग्यता चाचणी देण्याची संधी उमेदवारास 5 वेळा मिळणार असून यातील जास्तीत जास्त गुणांच्या आधारे संबंधित संस्थेकडे संगणकीय प्रणालीच्या आधारे अर्ज करता येईल.

तसेच राज्यातील सर्व शासन सहाय्यित संस्थांतर्गत असलेल्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च शाळांमधील शिक्षण सेवकांची रिक्त पदावर भरती करताना कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार “सरल” या संगणकीय प्रणालीवरील नोंदणीकृत विद्यार्थी संख्येच्या आधारे सर्व शाळांची मान्यता करण्यात येणार आहे.

राज्यातील शिक्षण सेवकाच्या रिक्त पदांची माहिती ही विषय, प्रवर्ग, माध्यम व बिंदूनामावलीनुसार “मदत” या संगणकीय प्रणालीद्वारे प्रसिद्ध केली जाणार आहे. तसेच सर्व व्यवस्थापनांच्या शाळांतील शिक्षण सेवकांच्या रिक्त पदांच्या भरतीसाठी  व्यावसायिक व किमान शैक्षणिक पात्रतेसह विषयनिहाय, माध्यमनिहाय, प्रवर्गनिहाय व बिंदुनामावलीनुसार जाहिरात “पवित्र” या संगणकीय प्रणालीमध्ये किमान 15 दिवसाच्या कालावधीसाठी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तसेच सदर जाहिरात वृत्तपत्रांमधून संबंधित संस्थांकडून प्रसिद्ध करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया संगणकीय प्रणालीच्या आधारे करण्यात येणार असून यामुळे भरती प्रक्रियेतील अनुचित हस्तक्षेपाला आळा बसणार आहे.

खाजगी शाळेतील रिक्त पदांवर चाचणी परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारे उमेदवाराची निवड करण्यासाठी महाराष्ट्र खाजगी शाळेतील कर्मचारी नियमावली 1981 मधील नियमामध्ये सुधारणा करण्यास मंत्रिमंडळाकडून मान्यता देण्यात आली  आहे. मात्र,स्वयंअर्थसहाय्यित शाळा व अल्पसंख्याक संस्थांच्या शाळांमधील शिक्षण सेवक भरतीस अभियोग्यता चाचणी प्रक्रिया लागू राहणार नाही.

अहिल्याबाई होळकर - भाग 1



*अधिकारकाळ- डिसेंबर ११, इ.स. १७६७ - ऑगस्ट १३, इ.स. १७९५

*राज्याभिषेक- डिसेंबर ११, इ.स. १७६७

*राज्यव्याप्ती- माळवा

*राजधानी- रायगड

*पूर्ण नाव- पुण्यश्लोक अहिल्याबाई खंडेराव होळकर

*पदव्या- राजमाता

*जन्म- मे ३१ , इ.स. १७२५
चौंडीगाव , जामखेडतालुका , अहमदनगर , महाराष्ट्र , भारत

*मृत्यू- ऑगस्ट १३, इ.स. १७९५
महेश्वर

*पूर्वाधिकारी- खंडेराव होळकर

*दत्तकपुत्र- तुकोजीराव होळकर

*उत्तराधिकारी- तुकोजीराव होळकर

*वडील- माणकोजी शिंदे

*राजघराणे होळकर

अहिल्याबाई होळकर किंवा अहिल्यादेवी होळकर (इ.स. १७२५ ते इ.स. १७९५) या मराठा साम्राज्यातील महत्त्वाच्या व्यक्ती होत. त्यांना पुण्यश्लोक या उपाधीने संबोधले जाते.

*बालपण-

अहिल्यादेवींचा जन्म मे ३१ इ.स. १७२५ रोजी महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या खेड्यात झाला. त्यांचे वडील माणकोजी शिंदे हे त्या गावचे पाटील होते व धनगर होते. अहिल्यादेवी यांचे आजोळ उस्मानाबाद जिल्ह्यातील चोराखळी हे गांव होते. त्याकाळी स्त्रीशिक्षण फारसे प्रचलित नसतानाही तिच्या वडिलांनी त्यांना लिहिण्यावाचण्यास शिकवले होते.

बाजीराव पेशव्यांचे एक सरदार मल्हारराव होळकर हे माळवा प्रांताचे जहागीरदार होते. ते पुण्यास जाताना चौंडीस थांबले होते. आख्यायिकेनुसार, ८ वर्षाच्या अहिल्यादेवींना, मल्हाररावांनी एका देवळात बघितले. मुलगी आवडल्यामुळे त्यांनी तिला, स्वतःचा मुलगा खंडेराव याची वधू म्हणून आणले.

मल्हारराव होळकरांच्या त्या सून होत. अहिल्यादेवींचे पती खंडेराव होळकर यांचे इ.स. १७५४ मध्ये, कुम्हेरच्या लढाईत धारातीर्थी पडले. त्यांच्या मृत्यूनंतर सासरे मल्हाररावांनी अहिल्याबाईंना सती जाऊ दिले नाही. १२ वर्षांनंतर, मल्हारराव होळकर हेही मृत्यू पावले. त्यानंतर अहिल्याबाई मराठा साम्राज्याच्या माळवा प्रांताचा कारभार बघू लागल्या. अहिल्याबाईंनी आपल्या राज्याला तुंगांपासून?? वाचवले. त्या लढाईत अहिल्यादेवी स्वतः सैन्याचे नेतृत्व करीत होत्या. पुढे त्यांनी तुकोजीराव होळकर यांची सेनापती म्हणून नेमणूक केली.

एका इंग्रजी लेखकाने अहिल्यादेवी होळकर, यांना भारताच्या "कॅथरीन द ग्रेट, एलिझाबेथ, मार्गारेट" म्हटले आहे.[१] (इ.स. १७२५ - इ.स. १७९५, राज्यकालावधी इ.स. १७६७ - इ.स. १७९५) ही भारतातील, माळव्याच्या जहागीरदार असलेल्या होळकर घराण्याच्या 'तत्त्वज्ञानी राणी' म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी नर्मदातीरी, इंदूरच्या दक्षिणेससलेल्या महे श्वर या ठिकाणी आपली राजधानी हलविली. मल्हाररावांनी त्यांना प्रशासकीय व सैन्याच्या कामात पारंगत केलेल होते. त्या आधाराने अहिल्याबाईंनी इ.स. १७६६ ते इ.स. १७९५, म्हणजे त्यांच्या मृत्यूपर्यंत माळव्यावर राज्य केले.

अहिल्याबाई होळकर या उचित न्यायदानासाठी प्रसिद्ध होत्या.

राणी अहिल्यादेवी यांनी भारतभरात अनेक हिंदू मंदिरे व नदीघाट बांधले, किंवा त्यांचा जीर्णोद्धार केला; महेश्वर व इंदूर या गावांना सुंदर बनवले. त्या अनेक देवळांच्या आश्रयदात्या होत्या. त्यांनी अनेक तीर्थक्षेत्री धर्मशाळांचे बांधकाम केले. त्यांत द्वारका, काशी, उज्जैन, नाशिक व परळी वैजनाथ यांचा प्रामुख्याने समावेश आहे. वेरावळ येथील सोमनाथचे गझनीच्या महंमदाने ध्वस्त केलेले देऊळ बघून अहिल्यादेवींनी शेजारीच एक शंकराचे एक देऊळ बांधले. सोमनाथला जाणारे लोक या देवळालाही भेट देतात.

*शासक-
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे तैलचित्र
इ.स. १७६५ मध्ये सत्तेसाठी झालेल्या एका लढाईदरम्यान लिहिलेल्या एका पत्रावरून मल्हाररावांचा अहिल्याबाईंच्या कर्तृत्वावर किती विश्वास होता हे दिसून येते.
"चंबळ पार करून ग्वाल्हेर येथे जावा. तेथे तुम्ही ४-५ दिवस मुकाम करू शकता.तुम्ही मोठे सैन्य ठेवू शकता व त्यांचे शस्त्रांसाठी योग्य तजवीज करा.....कूच करतांना,मार्गावर तुम्ही सुरक्षेसाठी चौक्या लावा."
पूर्वीच शासक म्हणून तरबेज झाल्यामुळे, मल्हारराव व मुलाच्या मृत्यूनंतर, अहिल्याबाईंनी स्वतःलाच राज्यकारभार पाहू देण्याची अनुज्ञा द्यावी अशी पेशव्यांना विनंती केली. त्यांनी शासन करण्यास माळव्यात अनेकांचा विरोध होता, पण होळकरांचे सैन्य अहिल्याबाईंच्या नेतृत्वाखाली काम करण्यास उत्सुक होते. अहिल्याबाई सैनिकी कवायतीत हत्तीच्या हौद्याच्या कोपऱ्यात  चार धनुष्य आणि बाणांचे भाते ठेवत असत, असे म्हणतात.

पेशव्यांनी परवानगी दिल्यावर, ज्या माणसाने तिला विरोध केला होती त्यास चाकरीत घेऊन, तुकोजीराव होळकर (मल्हाररावांचा दत्तक पुत्र) यास सैन्याचा मुख्य करून, अहिल्यादेवी होळकरांनी पूर्ण दिमाखात माळव्यास प्रयाण केले. अहिल्याबाईंनी पडदा प्रथा कधीच पाळली नाही. त्या रोज जनतेचा दरबार भरवीत असत व लोकांची गाऱ्हाणी ऐकण्यास नेहमीच उपलब्ध असत. जरी राज्याची राजधानी ही नर्मदातीरावर असलेल्या महेश्वर येथे होती तरीही, इंदूर या खेड्याचा विकास करून त्याचे सुंदर मोठ्या शहरात रूपांतर करणे, हे अहिल्याबाईंनी केलेले फार मोठे काम होते. त्यांनी माळव्यात रस्ते व किल्ले बांधले, अनेक उत्सव भरवले, हिंदूमंदिरांमध्ये कायमस्वरूपी पूजा सुरू रहावी म्हणून अनेक दाने दिली., माळव्याबाहेरही त्यांनी मंदिरे, घाट, विहिरी, तलाव व धर्मशाळा बांधल्या.

भारतीय संस्कृती कोशात अहिल्याबाई होळकरांनी केलेल्या बांधकामांची यादी आहे-काशी, गया, सोमनाथ,अयोध्या, मथुरा, हरिद्वार, कांची, अवंती, द्वारका, बद्रीकेदार, रामेश्वर व जगन्नाथपुरी वगैरे. अहिल्यादेवींस, सावकार, व्यापारी, शेतकरी इत्यादी आर्थिकदृष्ट्या सुदृढ झालेले बघून आनंद होत असे. परंतु त्यांनी त्यांच्यावर आपला अधिकार असल्याचे कधीच जाणवू दिले नाही. त्यांनी सर्व राज्यकारभार हा सुखी व धनाढ्य लोकांकडून नियमांतर्गत मिळालेल्या धनापासून चालविला होता, असे दिसते.

अहिल्याबाईंनी जनतेच्या/रयतेच्या काळजीपोटी अनेक गोष्टी प्केल्या. त्यांनी अनेक विधवांना पतीची मिळकत त्यांच्यापाशीच ठेवण्यात मदत केली. अहिल्याबाई च्या राज्यात कोणीही विधवा मुलाला दत्तक घेऊ शकत असे. एकदा त्यांच्या एका मंत्र्याने लाच घेतल्याशिवाय दत्तक घेण्याच्या मंजुरीस नकार दिला, तेव्हा अहिल्याबाईंनी दत्तकविधानाचा कार्यक्रम स्वतः प्रायोजित करून, रीतसर कपडे व दागिन्यांचा आहेर दिला. अहिल्यादेवी होळकरांच्या स्मृतीस अभिवादन म्हणून, सन १९९६ मध्ये, इंदुरातील नागरिकांनी तिच्या नावाने एक पुरस्कार सुरू केला. तो, दरवर्षी, जनसेवेचे विशेष काम करणाऱ्यास दिला जातो. भारताच्या पंतप्रधानांनी पहिल्या वर्षी तो पुरस्कार नानाजी देशमुखांना दिला.

त्यांच्या स्मरणार्थ, इंदूर विद्यापीठास अहिल्याबाई होळकर असे नाव दिलेले आहे.

भिल्ल व गोंड या राज्याच्या सीमेवर असलेल्या जमातींमधील वाद अहिल्यादेवी सोडवू शकल्या नाहीत. तरीही, त्यांनी त्या लोकांना पहाडातील निरुपयोगी जमीन दिली आणि त्यांना, त्या क्षेत्रातून जाणाऱ्या सामानावर थोडा 'कर' घेण्याचा अधिकार दिला. याही बाबतीत, (आंग्ल लेखक) 'माल्कम' यांच्यानुसार, अहिल्याबाईंनी 'त्यांच्या सवयींवर लक्ष ठेवले'.

महेश्वर येथील अहिल्यादेवींची राजधानी ही जणू काव्य, संगीत, कला व उद्योग यांची संस्थाच होती. महाराष्ट्रातील प्रसिद्ध मराठी कवी मोरोपंत व शाहीर अनंतफंदी यांना व संस्कृत विद्वान खुशालीराम यांना अहिल्याबाईंनी आश्रय दिला. कारागीर, मूर्तिकार व कलाकारांना त्यांच्या राजधानीत सन्मान व वेतन मिळत असे. त्यांनी महेश्वर शहरात एक कपड्याची गिरणीपण सुरू केली.

एकोणीसाव्या व विसाव्या शतकातील, भारतीय, इंग्रजी व अमेरिकन इतिहासकार हे मान्य करतात की, अहिल्यादेवी होळकरांस माळवा व महाराष्ट्रात, त्या काळी व आताही, संताचा सन्मान दिला जातो. इतिहासाच्या कोणाही अभ्यासकास ते मत खोडून काढण्याजोगे आजवर काहीही सापडलेले नाही.


*त्यांच्याबद्दलची मते -
"अहिल्याबाई एक अतिशय योग्य शासक व संघटक होत्या. मध्य भारताच्या इंदूरमधील त्याचा राज्यकाळ सुमारे तीस वर्षे चालला. हा एक स्वप्नवत काळ होता. या काळात कायद्याचे राज्य होते आणि त्यामुळे त्या काळात जनतेची भरभराट झाली. अहिल्यादेवी होळकरांना जीवनकालात तर सन्मान मिळालाच पण मृत्यूनंतरही लोकांनी त्यांना संताचा दर्जा दिला."[२]

"ज्याप्रमाणे अकबर हा पुरुषांमधला उत्तम राजा तसेच अहिल्याबाई ही स्त्रियांमधील उत्तम राज्यकर्ती होती. जिच्या चांगल्या बुद्धीचे, चांगुलपणाचे व गुणांचे उदाहरण देता येऊ शकते. अशी अहिल्याबाई ही एक महान स्त्री होती." [३] "आपल्या असामान्य कर्तृत्वाने अहिल्याबाईंनी रयतेचे मन जिंकले. नाना फडणवीसांसकट अनेक उच्च धुरीण आणि माळव्यातील लोकांनुसार ती एक दिव्य अवतार होती. ती आजतागायतची सर्वांत शुद्ध व उदाहरण देण्याजोगी शासक होती.[४] अलीकडच्या काळातील चरित्रकार अहिल्याबाईंना 'तत्त्वज्ञानी राणी' असे संबोधतात. याचा संदर्भ बहुतेक 'तत्त्वज्ञानी राजा' भोज याच्याशी असावा.[५]

*आणखी मते -
अहिल्याबाई होळकर ह्या एक खरोखरीच विस्तृत राजकीय दृश्यपटलाच्या एक सूक्ष्म अवलोकनकर्त्या होत्या. सन १७७२ मध्ये पेशव्यांना लिहिलेल्या एका पत्रात त्यांनी ब्रिटिशांबरोबर हातमिळवणी करण्याबाबत एक ताकीद दिली होती. त्यांना कवटाळणे हे अस्वलास कवटाळण्याजोगे असल्याचे त्यांनी नोंदले आहे :" वाघासारखे इतर प्राणी हे शक्ती वा युक्तीने मारले जाऊ शकतात, परंतु अस्वल मारणे हे फारच कठीण असते. सरळ त्याच्या चेहर्‍यावर वार केल्यासच ते मरते. एकदा त्याच्या मजबूत पकडीत सापडल्यावर ते त्याच्या शिकारीस, गुदगुल्या करून ठार मारते. असाच इंग्रजांचा मार्ग आहे. हे बघता, त्यांच्यावर मात करणे कठीण आहे.[६]

"या इंदूरमधील शासकांनी, त्यांच्या अखत्यारीत असलेल्या सर्वांस चांगले काम करण्यास प्रोत्साहन दिले. व्यापाऱ्यांनी चांगल्या कपड्यांचे उत्पादन केले, व्यापार वाढला, शेतकरी हे शांततेत व दबावरहित होते. कोणतेही प्रकरण राणीच्या निदर्शनास आले की ते कडकपणे हाताळले जाई. अहिल्याबाईंना आपल्या प्रजेचा उत्कर्ष आवडत असे. तसेच ती प्रजा राजा हिसकावून घेईल म्हणून आपली संपत्ती उघड करण्यास घाबरत नाही, हे बघणे आवडत असे. दूरदूरपर्यंत, रस्त्यांच्या कडेला, दाट छायादार वृक्ष लावण्यात आले होते, विहिरी केल्या होत्या, पथिकांसाठी विश्रांतीगृहे. गरीब ,घर नसलेले व अनाथ या सर्वांना त्यांच्या जरुरीनुसार, सर्व मिळत होते. बहुत काळापासून, भिल्ल लोक पहाडांतून सामानाची नेआण करत असतांना लूटमार करीत असत. अहिल्याबाईंनी त्यांना त्यातून मुक्ती मिळवून दिली व प्रामाणिकपणे शेती करण्याची संधी त्यांना देऊ केली. सर्व समाजाला अहिल्याबाई आवडत असत आणि तो त्यांच्या उदंड आयुष्याची प्रार्थना करी. त्यांच्या कन्येने तिचा पती, यशवंतराव फानसे यांच्या मृत्यूनंतर सती जाणे हे अहिल्याबाईंच्या आयुष्यातले शेवटचे सर्वात मोठे दुःख होते.[७]

वयाच्या ७०व्या वर्षी अहिल्याबाई होळकरांची प्राणज्योत निमाली.

भारत स्वतंत्र झाल्यावरही पुढील अनेक वर्षे शेजारील भोपाळ, जबलपूर किंवा ग्वाल्हेर या शहरांपेक्षा इंदूर सर्व बाबतीत प्रगतीशील राहिले. याच्या मागे अहिल्याबाईंची दूरदृष्टी होती.

*अहिल्याबाई होळकर यांचे टपाल तिकिट -
अहिल्याबाईंच्या सन्मान व स्मृतिप्रीत्यर्थ भारत सरकारने ऑगस्ट २५ , इ.स. १९९६ या दिवशी एक डाक तिकिट जारी केले.[१]

या अशा शासनकर्तीस मानवंदना म्हणून इंदूरच्या विमानतळाचे नाव "देवी अहिल्याबाई विमानतळ" असे ठेवण्यात आले आहे, आणि इंदूर विद्यापीठास "देवी अहिल्या विश्ववि द्यालय" असे नाव देण्यात आले आहे".

*त्यांची भारतभरातील कामे -
अकोले तालुका- विविध ठिकाणी विहिरी उदा. वाशेरे, वीरगाव, औरंगपूर.
अंबा गाव – दिवे.
अमरकंटक (मप्र)- श्री विघ्नेश्वर, कोटितीर्थ, गोमुखी, धर्मशाळा व वंश कुंड
अलमपूर (मप्र) – हरीहरेश्वर, बटुक, मल्हारीमार्तंड, सूर्य, रेणुका,राम, हनुमानाची मंदिरे, लक्ष्मीनारायणाचे,मारुतीचे व नरसिंहाचे मंदिर, खंडेराव मार्तंड मंदिर व मल्हाररावांचे स्मारक
आनंद कानन – श्री विघ्नेश्वर मंदिर.
अयोध्या (उ.प्र.)– श्रीरामाचे मंदिर, श्री त्रेता राम, श्री भैरव, नागेश्वर/सिद्धार्थ मंदिरे, शरयू घाट, विहिरी, स्वर्गद्वारी मोहताजखाना, अनेक धर्मशाळा.
आमलेश्वर, त्र्यंबकेश्वर मंदिरांचा जीर्णोद्धार
उज्जैन (म.प्र.)– चिंतामणी गणपती,जनार्दन,श्री लीला पुरुषोत्तम,बालाजी तिलकेश्वर,रामजानकी रस मंडळ,गोपाल,चिटणीस,बालाजी,अंकपाल,शिव व इतर अनेक मंदिरे,१३ घाट,विहिरी व अनेक धर्मशाळा इत्यादी.
ओझर (अहमदनगर) (महाराष्ट्र) – २ विहिरी व कुंड.
इंदूर – अनेक मंदिरे व घाट
ओंकारेश्वर (मप्र) – मामलेश्वर महादेव,
कर्मनाशिनी नदी – पूल
काशी (बनारस) – काशी विश्वनाथ,श्री तारकेश्वर, श्री गंगाजी, अहिल्या द्वारकेश्वर, गौतमेश्वर व अनेक महादेव मंदिरे, मंदिरांचे घाट, मनकर्णिका, दशास्वमेघ, जनाना, अहिल्या घाट, उत्तरकाशी, रामेश्वर पंचक्रोशी, कपिलधारा धर्मशाळा, शीतल घाट.
केदारनाथ – धर्मशाळा व कुंड
कोल्हापूर(महाराष्ट्र) – मंदिर-पूजेसाठी साहाय्य.
कुम्हेर – विहीर व राजपुत्र खंडेरावांचे स्मारक.
कुरुक्षेत्र (हरयाणा) - शिव शंतनु महादेव मंदिरे,पंचकुंड व लक्ष्मीकुंड घाट.
गंगोत्री –विश्वनाथ, केदारनाथ, अन्नपूर्णा, भैरव मंदिरे, अनेक धर्मशाळा.
गया (बिहार) – विष्णुपद मंदिर.
गोकर्ण – रावळेश्वर महादेव मंदिर, होळकर वाडा, बगीचा व गरीबखाना.
घृष्णेश्वर (वेरूळ) (महाराष्ट्र) – शिवालय तीर्थ.
चांदवड वाफेगाव(महाराष्ट्र) – विष्णु व रेणुकेचे मंदिर.
चिखलदा – अन्नछत्र
चित्रकूट (उ.प्र.) - श्रीरामचंद्राच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा
चौंडी – चौडेश्वरीदेवी मंदिर, सिनेश्वर महादेव मंदिर, अहिल्येश्वर मंदिर, धर्मशाळा व घाट
जगन्नाथपुरी (ओरिसा) – श्रीरामचंद्र मंदिर, धर्मशाळा व बगीचा
जळगांव(महाराष्ट्र) - राम मंदिर
जांबगाव – रामदासस्वामी मठासाठी दान
जामघाट – भूमिद्वार
जेजुरी(महाराष्ट्र) – मल्हारगौतमेश्वर, विठ्ठल, मार्तंड मंदिरे, जनाई महादेव व मल्हार या नावाचे तलाव.
टेहरी (बुंदेलखंड) – धर्मशाळा.
तराना? – तिलभांडेश्वर शिव मंदिर, खेडपती, श्रीराम मंदिर, महाकाली मंदिर.
त्र्यंबकेश्वर (नाशिक) (महाराष्ट्र)– कुशावर्त घाटावर पूल.
द्वारका(गुजरात) – मोहताजखाना, पूजागृह व पुजार्‍यांना काही गावे दान.
श्री नागनाथ (दारुकावन) – १७८४मध्ये पूजा सुरू केली.
नाथद्वार – अहिल्या कुंड, मंदिर, विहीर.
निमगाव (नाशिक) (महाराष्ट्र)– विहीर.
नीलकंठ महादेव – शिवालय व गोमुख.
नैमिषारण्य (उ.प्र.) – महादेव मंडी, निमसर धर्मशाळा, गो-घाट, चक्रीतीर्थ कुंड.
नैम्बार (मप्र) – मंदिर
पंचवटी (नाशिक)(महाराष्ट्र)– श्री राम मंदिर, गोरा महादेव मंदिर, विघ्नेश्वर मंदिर, धर्मशाळा, रामघाट.
पंढरपूर(महाराष्ट्र) – श्री राम मंदिर, तुळशीबाग, होळकर वाडा, सभा मंडप ,धर्मशाळा व मंदिरास चांदीची भांडी दिली.
पिंपलास (नाशिक) (महाराष्ट्र)– विहीर.
पुणतांबे(महाराष्ट्र) – गोदावरी नदीवर घाट.
पुणे (महाराष्ट्र) – घाट.
पुष्कर – गणपती मंदिर,मंदिरे,धर्मशाळा व बगीचा.
प्रयाग (अलाहाबाद,उ.प्र.) - विष्णु मंदिर, घाट व धर्मशाळा, बगीचा, राजवाडा.
बद्रीनारायण (उ.प्र.) –श्री केदारेश्वर मंदिर, हरिमंदिर, अनेक धर्मशाळा (रंगदचाटी, बिदरचाटी, व्यासंग, तंगनाथ, पावली) मनु कुंड (गौरकुंड व कुंडछत्री), देवप्रयाग येथील बगीचा व गरम पाण्याचे कुंड, गायींच्या चरण्यासाठीकुरणे.
बर्‍हाणपूर (मप्र) – घाट व कुंड.
बिठ्ठूर – ब्रह्मघाट
बीड (महाराष्ट्र)– घाटाचा जीर्णोद्धार.
बेल्लूर (कर्नाटक) – गणपती, पांडुरंग, जलेश्वर, खंडोबा, तीर्थराज व अग्नि मंदिरे, कुंड
' भरतपूर' – मंदिर, धर्म शाळा व कुंड.
भानपुरा – नऊ मंदिरे व धर्मशाळा.
भीमाशंकर (महाराष्ट्र) – गरीबखाना
भुसावळ (महाराष्ट्र) - चांगदेव मंदिर
मंडलेश्वर – शिवमंदिर घाट
मनसा – सात मंदिरे.
महेश्वर - शंभरावर मंदिरे,घाट व धर्मशाळा व घरे.
मामलेश्वर महादेव – दिवे.
मिरी (अहमदनगर) (महाराष्ट्र) – सन १७८० मध्ये भैरव मंदिर
रामपुरा – चार मंदिरे, धर्मशाळा व घरे.
रामेश्वर (तामिळनाडु) – हनुमान, श्री राधाकृष्णमंदिरे, धर्मशाळा ,विहिर, बगीचा इत्यादी.
रावेर (महाराष्ट्र)– केशव कुंड
वाफेगाव (नाशिक)(महाराष्ट्र) – होळकर वाडा व विहीर.
श्री विघ्नेश्वर – दिवे
वृंदावन (मथुरा) – चैनबिहारी मंदिर, कालियादेह घाट, चिरघाट व इतर अनेक घाट, धर्मशाळा व अन्नछत्र.
वेरूळ(महाराष्ट्र) – लाल दगडांचे मंदिर.
श्री वैजनाथ (परळी,)


प्रकाशित पुस्तके -

'अहिल्याबाई' : लेखक - श्री. हिरालाल शर्मा
'अहिल्याबाई चरित्र' : लेखक - श्री. पुरुषोत्तम
'अहिल्याबाई चरित्र' : लेखक - श्री. मुकुंद वामन बर्वे
अहिल्याबाई होळकर - वैचारिक राणी (लेखक : म.ब. कामत व व्ही.बी.    
अहिल्याबाई होळकर : लेखक - म.श्री. दीक्षित
अहिल्याबाई होळकर (चरित्र), लेखक : खडपेकर
'कर्मयोगिनी' : लेखिका - विजया जहागीरदार
महाराष्‍ट्राचे शिल्‍पकार - तेजस्विनी अहिल्‍याबाई होळकर (लेखिका : विजया जहागीरदार; प्रकाशक : महाराष्ट्र सरकार)
'ज्ञात- अज्ञात अहिल्याबाई होळकर' लेखक - विनया खडपेकर


प्रसिद्ध चित्रपट -

देवी अहिल्या बाई या नावाचा एक चित्रपट सन २००२ मध्ये आला होता. त्यात शबाना आझमी हिने हरकूबाई म्हणून (खांडा? राणी, मल्हारराव होळकरांची एक पत्‍नी) भूमिका केली होती. चित्रपटात सदाशिव अमरापूरकर यांची मल्हारराव होळकर (अहिल्याबाईचे सासरे) म्हणून भूमिका होती. [२]
अहिल्याबाईच्या जीवनकालावर, इ.एम.आर.सी.इंदूर तर्फे एक २० मिनिटांची डॉक्युमेंटरी चित्रफीत बनविली गेली होती.

   🔲🔲🔲🔲🔲🔲🔲

अँड्रॉइड फोनवर‘ज्युडी’चा हल्ला


तुमच्याकडे अँड्रॉइड प्रणाली आधारित स्मार्टफोन असेल आणि तुम्ही एखादे अॅप सुरू केल्यावर स्क्रीनवर आलेली जाहिराती पाहण्याच्या मोहात पडला असाल तर सावधान! तुमच्या मोबाइलला ज्युडी या मालवेअरची लागण होण्याचा धोका आहे. कम्प्युटरना ग्रासलेल्या ‘वॉनाक्राय’ या मालवेअरच्या धक्क्यातून जग नुकते सावरत असतानाच या नव्या मालवेअरचा धुमाकूळ सुरू झाला आहे.

ज्युडीची लागण आतापर्यंत ८.५ ते ३६.५ दशलक्ष वापरकर्त्यांच्या स्मार्टफोनना झाल्याची भीती चेकपॉइंट या सायबर सुरक्षा सोल्युशन्स एजन्सीने व्यक्त केली आहे. या मालवेअरने गुगलचे अधिकृत अॅप स्टोअर असलेल्या ‘गुगल-प्ले’लाच आपले लक्ष्य बनवले आहे. ज्युडी हे मालवेअर जाहिरातींना चिकटत असल्याने त्याला अॅडवेअर असे म्हणण्यात येत आहे. ज्युडीची लागण एका कोरियन कंपनीने विकसित केलेल्या ४१ अॅपना झाल्यामुळे ज्युडीचे प्रताप उघड होऊ लागले. मात्र, ज्युडीमुळे किती देशांना फटका बसला आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

गुगलप्लेवर उपलब्ध अॅपपैकी अनेक अॅप या मंचावर वर्षानुवर्षे उपलब्ध आहेत. यातील अनेक अॅप्स अद्ययावत केले गेले आहेत. त्यामुळेच नेमक्या कोणकोणत्या अॅपना ‘ज्युडी’ची लागण झाली आहे, अर्थात कोणकोणत्या अॅपच्या आज्ञावलीमध्ये ज्युडीने स्वतःचे कोड घुसवले आहेत, हे कळण्यास वाव नाही. चेक पॉइंटने ज्युडीविषयी माहिती जाहीर केल्यावर गुगलप्लेने तत्काळ असे बाधित अॅप काढून टाकले आहेत.

▪️ज्युडीची कार्यप्रणाली

अँड्रॉइड प्रणालीवर चालणाऱ्या स्मार्टफोनवर पॉपअप होणाऱ्या जाहिरातींतून ज्युडी त्या मोबाइल फोनमध्ये प्रवेश करतो. मग वारंवार जाहिराती पॉपअप करून त्यावर क्लिक करण्यासाठी मोबाइल वापरकर्त्याला उद्युक्त करतो. अशा प्रत्येक क्लिकबरोबर या मालवेअरच्या निर्मात्यांसाठी ज्युडी महसूल मिळवतो.

‘बीएसएनएल’देणार उपग्रह फोन सेवा


भारत संचार निगम लिमिटेड अर्थात बीएसएनएलतर्फे येत्या दोन वर्षांत उपग्रह (सॅटेलाइट) फोन सेवेचा विस्तार करण्यात येणार आहे. ही सेवा सर्वांसाठी असणार असल्याचेही कंपनीने स्पष्ट केले आहे. सेवा सुरू झाल्यानंतर ग्राहकांची मोबाइलची सेवा अचानक ‘डाउन’ होण्याच्या समस्येपासून सुटका होण्याची शक्यता आहे.

‘बीएसएनएल’चे अध्यक्ष अनुपम श्रीवास्तव म्हणाले की,‘ आम्ही इंटरनॅशनल मेरिटाइम ऑर्गनायझेशनकडे यासंदर्भात अर्ज केला आहे. या प्रक्रियेला काही वेळ लागण्याची शक्यता आहे. येत्या १८ ते २४ महिन्यांमध्ये आम्ही देशभर सॅटेलाइट फोनसेवा सादर करू. सॅटेलाइट फोनचे वैशिष्ट्य म्हणजे देशाच्या कानाकोपऱ्यात ते सेवा देऊ शकतील. इतकेच नव्हे तर, विमानात किंवा पाणबुड्यांमध्येही ते सेवा देण्यास सक्षम आहेत. परंपरागत मोबाइल टॉवर आजूबाजूच्या पंचवीस ते तीस किलोमीटर क्षेत्रातच कार्यरत राहू शकतात. मात्र, सॅटेलाइट फोनच्या सेवेवर कार्यक्षेत्राची मर्यादा येत नाही.’

सॅटेलाइट फोनसाठी ‘बीएसएनएल’तर्फे ‘INMARSAT’सेवेची मदत घेतली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात ही सेवा सरकारी आस्थापनांसाठी कार्यरत होणार आहे. त्यामध्ये पोलिस, रेल्वे, बीएसएफ आदींचा समावेश आहे. त्यानंतर सर्वसामान्यांनाही सॅटेलाइट फोनचा उपयोग करता येणार आहे. सध्या देशात अतिशय अल्प प्रमाणात सॅटेलाइट फोनचा वापर केला जातो.