शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

Tuesday, 30 May 2017

राजा आणि कुत्रा

बोधकथा क्रमांक - 1

एक राजा आपल्या कुत्र्यासोबत होडीतून जात होता. कुत्रा याआधी कधी होडीत न बसल्याने त्याला हे सगळं नवीन होत. त्यामुळे तो अस्वस्थ होऊन उड्या मारू लागला भुंकू लागला.
त्याचा सहप्रवाश्यांना त्रास तर होऊ लागलाच पण होडी चालणारा नावाडी ही हैराण झाला. होडीत अशीच परिस्थिती राहीली तर नाव पलटू शकते. स्वःता तर बूडेन बरोबर सगळ्याना घेऊन बूडेल.
राजाच्या लक्षात ही गोष्ट आली तो ही कुत्र्याला शांत करण्याचा प्रयत्न करू लागला पण कुत्रा तो कुत्रा. तो पहील्यापेक्षा जास्त गडबड करू लागला.
हे पाहून एक हुशार प्रवासी पुढे आला आणि राजाला विनम्रपणे म्हणाला "महाराज, मला जर परवानगी दिली तर मी या कुत्र्याला गरीब मांजर बनवतो." राजाने होकार देताच त्या प्रवाश्याने तीन चार प्रवाश्यांच्या मदतीने कुत्र्याला उचलले आणि पाण्यात फेकून दिले.
कुत्र्याच्या काना तोंडात पाणी शिरू लागले श्वास घेणे मुश्किल झाले. शेवटी जिवाच्या आकांतने नावेचा आधार घेऊन तरंगू लागला. त्याला नावेची गरज लक्षात आली. थोड्या वेळात त्याला ओढून नावेवर घेतले आणि तो चुपचाप एका कोपर्यात जाऊन बसला.

त्याने हे वर्तन पाहून राजा आश्चर्यचकीत झाला व म्हणाला " पहा. पहिलं किती त्रास देत होता आणि आता भित्र्या मांजरासारखा चुपचाप बसलाय." प्रवाशी हसून म्हणाला " महाराज, जो पर्यंत स्वताःला त्रास होत नाही तो पर्यंत दुसऱ्याच्या त्रासाची कल्पना येत नाही. त्याला जेव्हा पाण्यात फेकले तेव्हा त्याला स्वतःच्या जिवाची काळजी वाटू लागली आणि नावेची गरज."

घन आकृती महत्त्वाची सूत्रे

========

1) इष्टीकाचित्ती  -

पृष्टफळ   =   [ 2lb + 2bh + 2lh ]

घनफळ    = l × b × h
----------------------------------------------
2)  घन

पृष्टफळ    =   6 × l²

घनफळ     = l × l × l  = l³
---------------------------------------------
3) वृत्तचित्ती / दंडगोल

वकृ पृष्टफळ  = 2πrh

एकूण पृष्टफळ = 2πrh  + 2πr²

घनफळ         = πr²h
----------------------------------------------
4)   शंकू  

वकृ  पृष्टफळ    =  πrl

एकूण पृष्टफळ  = πr² + πrl
                        = πr ( r + l )

घनफळ      = 1/3  × πr²h
----------------------------------------------
5) गोल

पृष्टफळ   =  4πr²

 घनफळ   = 4/3 × πr³
----------------------------------------------
6) अर्धगोल

वक्र पृष्टफळ = 2πr²

पृष्टफळ एकूण   = 3πr²

घनफळ    = 2/3 × πr³
---------------------------------------------
7)  पिरॉमिड

पृष्टफळ  =( पाया क्षे. )+1/2×lbn
                  (  n  -  पाया एकूण बाजु)

घनफळ   =  1/3 ×(पाया क्षे. )×h
----------------------------------------------
8)  बकेटाकृती घन

घनफळ  = 1/3×πh(r² +rR + R²)

r  - वरची ञिज्या ,R - खालची ञिज्या

==========================
📌  वरील सर्वच घनाकृतीत ....

l  -  लांबी / तिरकस उंची
b  - रूंदी
h  - उंची
r  - ञिज्या
π  - 22/7  or  3.14

==========================
श्री .प्रविण बनकर मो.8856046142

सामान्यज्ञान प्रश्नसंच क्रमांक 1

1) सरदार पटेल यांची तुलना खालीलपैकी कोणाशी केली जाते?

अ) जोसेफ मॅझीन ब) नेपोलियन क) बिस्मार्क ड) चर्चिल

2)’अ‍ॅट द फिट ऑफ महात्मा गांधी’ या पुस्तकाचे लेखक कोण?

अ) जवाहरलाल नेहरू ब) मौलाना आझाद क) वल्लभभाई पटेल ड) राजेंद्र प्रसाद

3) अरब-इस्त्रायल संघर्षात भारताची भूमिका नेहमी कशी राहिली?

अ) अरब राष्ट्रांना अनुकूल ब) अमेरिकेच्या भूमिकेप्रमाणे क) रशियाच्या भूमिकेप्रमाणे ड) इस्त्रायलला अनुकूल

4) पाकिस्तानचे पहिले गर्व्हनर जनरल कोण होते?

अ) लॉर्ड माऊंट बॅटन ब) लियाकत अली क) बॅ.महम्मद अली जिना ड) महम्मद इकबाल

5) इंदिरा गांधी सर्वप्रथम किती साली पंतप्रधान म्हणून सत्तेवर आल्या?

अ) 1964 ब) 1965 क) 1966 ड) 1967

6) खालीलपैकी कोणाचे नाव गरीब हटाव या घोषणेशी जोडता येईल?

अ) मोरारजी देसाई ब) इंदिरा गांधी क) राजीव गांधी ड) लाल बहादूर शास्त्री

7) चले जावच्या चळवळीत महात्मा गांधींनी भारतातील जनतेस कोणता मंत्र दिला होता?

अ) मरा किंवा जिंका ब) करा किंवा मरा क) जिंका किंवा मरा ड) मारा किंवा जिंका

8) खालीलपैकी कोणास मुस्लिम लिगचे संस्थापक म्हणून ओळखतो?

अ) नवाब सलिमुल्ला ब) बॅ. मोहम्मद अली जिना क) आगा खान ड) सर सय्यद अहमद खान

9) गांधी आणि लेनीन या पुस्तकाचे लेखक कोण?

अ) वसंतराव तुळपुळे ब) नारायणराव लोखंडे क) राममनोहर लोहिया ड) श्रीपाद अमृत डांगे

10) बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म खालीलपैकी कोठे झाला होता?

अ) दापोलीजवळ आंबावडे ब) इंदुरजवळ महू क) मराठवाड्यात औरंगाबाद ड) रत्नागिरीजवळ चिखली

*उत्तर* : (1 - क), (2 - ड), (3 - अ), (4 - क), (5 - क), (6 - ब), (7 - ब), (8 - अ), (9 - ड), (10 - ब)

फास्ट वर्गमूळ कसे काढावे ?

1 मिनीटात वर्गमुळ काढण्यासाठी पुढील दोन Chart फक्त एकदा वाचा सहज पाठ होवून जातील..

==============================
 एक मिनीटात वर्ग शोधा....
Tricks..

 chart -1              chart -2
1²  =   1  |         10²    =  100
2²  =   4  |         20²    =  400
3²  =   9  |         30²    =  900
4²  =  16 |         40²   =1600
5²  =  25 |         50²   = 2500
6²  =  36 |         60²   = 3600
7²  =  49 |         70²   = 4900
8²  =  64 |         80²   = 6400
9²  =  81 |         90²   = 8100
10² = 100.  |   100²  = 10000
============================
एक मिनीटात वर्गमुळ कसे शोधायचे....

उदाहरणार्थ.....

2116  या संख्या चे वर्गमुळ काढायचे आहे....

Step -1
*एकक स्थानचा अंक आधी शोधा
16 च्या  एकक स्थानी 6 हा अंक आहे म्हणून ....chart -1 पहा.
*वर्गमुळात एकक स्थानी  4 किंवा  6 असेल

Step -2
*दशक स्थानचा अंक शोधने

*Chart-2 पहा....
2116 ही संख्या   कोणत्या संख्या च्या दरम्यान येते....
1600   -  2500 च्या दरम्यान येते.
म्हणजे ... दशक स्थानी 4 असेल .

म्हणजे वर्गमुळ   -  44  किंवा  46 असेल .      
Step -3
आता ....2116  ही संख्या ....
1600  व 2500 पैकी कोणाच्या जवळ आहे ठरवा....

तर 2116 ही संख्या  2500 च्या जवळ आहे

म्हणजे ....44  वा 46  पैकी   वर्ग 2500 च्या जवळ  46 चा असेल .

म्हणजे .....
√2116  =  46
=============================

श्री .प्रविण बनकर मो.8856046142

Plicker's card

मित्रांनो आज मी तुम्हांला छान App बद्दल  माहिती देणार आहे.
त्या अगोदर आपण plickers वेबसाईटला भेट द्या.
https://www.plickers.com
आपल्या Email ने login करा.
plickers dashboard वर आपल्याला अनेक टँब दिसतील.
1) Live
2) Liberary
3) Class
4) cards
5) Report
6) help

लायब्ररी: मधून विद्यार्थी  मूल्यमापनासाठी प्रश्न तयार करु शकता save ठेवू शकता.
class -: विद्यार्थी संख्येनुसार  विद्यार्थ्यांची नावे plicker कार्ड क्र. विद्यार्थ्यांना  Assign करु शकता.
cards tab-: चा वापर करून आपण  कार्ड डाऊनलोड करुन विद्यार्थी संख्येइतके print घेऊ शकता.(print शक्यतो white  पेपरवर घ्या व लँमिनेशन करणे टाळा.)

Plicker App download


ॲप वापरण्याची पद्धत -:
प्रथम मोबाईल वरुन plicker App open करा.

class select करा.

ॲप मधील *लायब्ररी टँब* वरून प्रश्न सेट करा.

live view टँब ला 📷click करा.

विद्यार्थी automatically प्रश्नाप्रमाणे update  होतात.
आपल्याला  त्वरीत विद्यार्थी निहाय निकाल मिळतो.
विद्यार्थ्यांचे response सुद्धा नोंदवले जातात.

कार्ड डाऊनलोड करण्यासाठी टच करा.

Plickers संदर्भात व्हीडीओ पाहण्यासाठी टच करा.


टिप-: विद्यार्थी  रोस्टरची pdf बनवून print घेता येते. विद्यार्थी  Response internet data बंद असतानाही नोंदवला जाऊ शकतो.
हे ॲप खूप छान आहे वेळेची बचत व अध्ययन अध्यापनात तंत्रज्ञान वापर व मनोरंजकता येते.

धन्यवाद
प्रदीप चासकर
आंबेगाव पुणे
9421858116/9657608354

महत्वाचे मोबाईल अँप्स

Office Lens : डॉक्युमेंट/फोटो स्कॅन करण्यासाठी मायक्रोसॉफ्टचं फ्री अॅप्लिकेशन

 WPS Office : मोफत वर्ड, पॉवरपॉईंट, एक्सेल, पीडीएफ फाइल बनवा/पहा

 ColorNote : नोट्स/नोंदी ठेवा, गूगलला जोडा, त्यांना पासवर्ड लावा

Keep : गूगलचं नोंदीसाठी अॅप

Pocket : इंटेरनेटवरील लिंक्स,लेख साठवा आणि नंतर केव्हाही वाचा !

Google Photos : फोटोज आणि व्हिडिओ वर्गवारी करून व्यवस्थित ठेवण्यासाठी उपयुक्त

Pixlr : फोटो एडिटर अनेक एफेक्ट्सह

  SnapSeed : फोटोना द्या आकर्षक इफेक्ट, फॉटोशॉपसारख्या सुविधा !

  PhotoFunia : फोटोनां मजेशीर इफेक्ट द्या

 PicsArt : फोटो एडिटर ब्रश, लेयर्स सारख्या सुविधांसह

Prisma : फोटोला द्या खर्‍याखुर्‍या चित्रासारखा इफेक्ट

 Sketchbook : अँड्रॉइड फोनवर काढा भन्नाट चित्रे ! अनेक उपयोगी टूल्ससह ..

Camera 360 : कॅमेरा साठी सर्वोत्तम अॅप, अनेक इफेक्टस

Hyperlapse : टाइमलॅप्स तयार करण्यासाठी मायक्रोसॉफ्टचं कॅमेरा अॅप

Open Camera : साध सोपं, कमी जागा घेणारं कॅमेरा अॅप्लिकेशन

SmartTools : फोनच्या हार्डवेअरचा वापर करून भन्नाट टुल्सचा आनंद घ्या गरजेनुसार !

SensorBox : तुमच्या फोनमध्ये कोणते सेन्सर आहेत आणि ते व्यवस्थित काम करत आहेत का ते पहा

Fing फिंग : तुम्ही कनेक्ट असलेल्या वायफायशी आणखी कोण कोण कनेक्ट आहे ते पहा या अॅप्लिकेशनच्या सहाय्याने

Parallel Space : एकाच फोनवर अनेक अकाऊंट वापरण्याची सोय ! ऑनलाइन गेम्ससाठी गेमर्सना उपयुक्त. एकाहून जास्त अकाऊंट एकाच फोनवर!

VLC : पीसीवरील विडिओ प्लेयर आता अँड्रॉडवर सुद्धा
MXPlayer : स्मार्टफोनसाठी सर्वोत्तम व्हिडिओ प्लेयर, सबटाइटलसारख्या अनेक वैशिष्ट्यपूर्ण सुविधा

Saavn / Gaana / Hungama: गाणी ऐका मोफत ऑनलाइन

Hotstar / Voot / Sony LIV : लाईव्ह टीव्ही, क्रिकेट सामने, चित्रपट पहा ऑनलाइन कधीही! कुठेही! नेट स्पीडनुसार करता येतं अॅडजस्ट, वेगवेगळ्या मालिकांचे भागसुद्धा उपलब्ध!

trackID, Shazam: वाजत असलेल कोणताही गाणं ओळखणारं अॅप

FlightRadar : तुम्ही उभ्या असलेल्या ठिकाणावरून कोणतं विमान जात आहे ते पहा या अॅपमध्ये !

ShareIt, Xender : फाइल्स शेअर करा अवघ्या काही सेकंदात ! तेही इंटरनेट शिवाय !

Google Fit : दिवसभरात किती अंतर चाललात ते पहा. दिवसाचं लक्ष्य सेट करा आणि ट्रॅक ठेवा

Go Launcher / Nova Launcher  : तुमच्या फोनमधील मेन्यूला वॉलपेपर, अॅप्लिकेशनला नवा लुक देण्यासाठी वापरा हे लॉंचर्स, आवडीनुसार थीम,रंग,आयकॉन लावा!    PrinterShare, PrintHand : यूएसबी OTG असलेल्या फोनला चक्क प्रिंटर जोडून प्रिंट काढा !

Android Device Manager : हरवेलला फोन शोधण्यासाठी गूगलचं अॅप

Softkey Enabler / Simple Control: काही कारणाने हार्डवेअर बटणे खराब झाली असतील तर हे अॅप वापरा. नक्की उपयोगी पडतील !

World of Goo : भन्नाट गेम नक्की खेळून पहा

Sprinkle Island : साधी सोपी गेम पण नक्कीच गंमतशीर

 Smash Hit : येणारे अडथळे फोडत कमीतकमी वेळात पुढे जाण्याची गेम

 mmVector : उत्तम गेम

Clash of Clans : ही प्रचंड यशस्वी ऑनलाइन गेम आहे, ऑनलाइन मित्रांची टिम बनवून दौर्‍य टिम(Clan)वर हल्ला करण्यासारख्या सोयी ह्यात आहेत!

ManuGanu : साधी सोपी गेम, सुंदर ग्राफिक्स सोबत

Flipkart, Snapdeal, Amazon, eBay  , : ऑनलाइन शॉपिंग

 Facebook Lite : कमी हार्डवेअर ताकदीच्या फोन्ससाठी फेसबुक अॅप

Hike Messenger : भारतीय मेसेजिंग अॅप (एयरटेल ग्रुप) व्हाट्सअॅपपेक्षा अधिक अनेक दर्जेदार सुविधा, खास भारतीयांसाठी स्टीकर्स !

Opera Max : इंटरनेट डाटा वाचवण्यासाठी ओपेराचं अॅप्लिकेशन

Google Indic Keyboard : भारतीय भाषांमध्ये टाइप / लिहिण्यासाठी गूगलचा कीबोर्ड

Unified Remote : तुमचा पीसी तुमच्या फोनने कंट्रोल करा !

Tablet Remote, RemoDroid : तुमचा अँड्रॉइड फोन दुसर्‍या अँड्रॉइड फोनवरून कंट्रोल करा !!

mmAZ Screen Recorder : फोनच्या स्क्रीनचा व्हिडिओ काढण्यासाठी अॅप

Automatic Call Recorder : फोन कॉल्स रेकॉर्ड करून ठेवण्यासाठी फ्री अॅप्लिकेशन !

TeamViewer : तुमचा कम्प्युटर तुमच्या फोनमधून कंट्रोल करा !

AppLock : अॅप्लिकेशनला लॉक घालण्यासाठी सर्वोत्तम अॅप

Google Goggles : QR कोड स्कॅन करा, भाषांतर करा, पर्यटन स्थळे ओळखा

SkyMap / StarChart : ह्या अॅप्सच्या मदतीने घ्या अवकाशातील ग्रह तार्‍यांचा वेध !

ISS Detector : International Space Station ची सध्याची स्थिती पाहण्यासाठी अॅप

Paytm, FreeCharge, Mobikwik : फोन क्रमांक रीचार्ज करा, पैसे पाठवा/मिळवा, खरेदी करा.
*कलात्मक ऍप्स*


_तुमच्याकडे कलात्मकता आहे आणि तुम्ही स्मार्टफोन वापरत असाल; तर ही काही अॅप्स तुम्हाला तुमची कलात्मकता वाढवण्यासाठी नक्की उपयोगी पडतील. काहीवेळा तितकीशी खास नसलेली काही अॅप्स जास्त रेटिंग घेऊन वर आलेली असतात अन् त्यामुळे काही भन्नाट अॅप्स मागे पडतात. त्यामुळे अशाच काही खास अॅप्सची माहिती..._


*_फोटोमॅथ:_*

इमेजेसमध्ये असलेली गणितं सोडवण्याचं काम सोपं करायचं असेल, तर फोटोमॅथ तुमच्यासाठी बरेच उपयुक्त आहे. इमेजच्या स्वरूपात असलेल्या गणिताला कॅमेऱ्याने टिपून, या अॅपच्या माध्यमातून सोडवता येऊ शकतं. हे गणित कॅमेऱ्याने टिपले की, तुम्हाला त्याचं उत्तर मिळतं. या अॅपमध्ये कॅलक्यूलेटर देखील आहे.


*_डांगो:_*

तुम्ही ईमोजीचा भरपूर वापर करत असाल, तर हे अॅप तुमच्यासाठी फायद्याचे आहे. कुठल्याही प्रकारचे मेसेजिंग अॅप चालू केल्यावर डांगो आपलं काम सुरू करतं. तुम्हाला येत असलेल्या मेसेजेसवर योग्यप्रकारे नजर ठेवून, त्या संभाषणासाठी महत्त्वाचे असलेले ईमोजी आणि जिफ्स वापरण्यासाठी तुम्हाला मदत करायचं काम या अॅपमुळे अत्यंत सोपं होतं.


*_इंकइट_*

अनेक कादंबऱ्यांचा संग्रह असलेलं अफलातून अॅप म्हणजे इंकइट! वेगवेगळ्या धाटणीतील या कादंबऱ्या वाचण्यासाठी विनामूल्य आहेत. इंटरनेट नसताना वाचण्यासाठी तुम्ही या कादंबऱ्या डाउनलोड करून ठेऊ शकता. ज्या शैलीतील वाचन तुम्ही नियमितपणे करता, त्या शैलीतील इतर पुस्तकांचे प्रस्ताव तुम्हाला सतत देणारे हे अॅप वाचनासाठी निश्चितच फायदेशीर आहे.


*_मूडकास्ट:_*

तुमच्या रोजच्या दिनक्रमावर लक्ष ठेवण्याचं काम हे अॅप करतं. नेहमीच्या सवयींवर लक्ष ठेऊन, नव्या चांगल्या सवयी लावण्यास हे अॅप मदत करतं. थोडक्यात तुम्ही या अॅपवर तुमची रोजची डायरी लिहू शकता. फेसबुकला जोडले जाऊन मूडकास्ट तुमच्या एफबी पोस्टनुसार तुमच्या मूडवर लक्ष ठेवण्यासही सक्षम आहे. याच्याच मदतीने तुमच्या सवयी बदलण्यास ते हातभार लावतं.


*_पॉडकास्ट गो:_*

अँड्रॉइड फोनसाठी सर्वोत्तम पॉडकास्ट प्लेअर असं या ऍपला म्हणता येईल. तीन लाखाहून अधिक पॉडकास्ट्स त्यांच्या विविध श्रेणींनुसार तुम्हाला इथे मिळतील. यात ट्रेंडिंग आणि प्रसिद्ध पॉडकास्ट्स शोधणंही फार सोपं आहे. तुम्ही अर्धवट सोडलेले शो किंवा नवे शो यांची वेगळी यादी तयार करायची सुद्धा सोय यात आहे.

Monday, 29 May 2017

छान छान गोष्टी

34 गोष्टी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.   Click Here

 किंवा

गोष्ट डायरेक्ट डाऊनलोड करण्यासाठी नावावर क्लिक करा.
1. करोडीमल

2. महामूर्ख न्हावी

3. महत्वाकांक्षी मित्र

4. मुंगुस आणि बाई

5. मूर्ख पंडित

6. राजाचे आवडते पोपट

7. साप आणि उंदीर

8. स्वार्थी पती - पत्नी

9. खरे बोलण्याचे फळ
 
10. पशु पक्षी आणि वटवाघूळ

11. दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ

12. दोन श्रीमंत

13. हावरटपणाचे फळ

14. मन्याचा वाजला बँडबाजा

15. आरसा हसला आरसा रडला

16. आभाळ पडलं पळा पळा

17. जादुगार ससोबा बेरकी कोल्होबा

18. कपटी जबडा हसून उघडा

19. कासव आणि हंस

20. सिंह, उंदीर आणि मांजर

21. मूर्ख उंदीर

22. मी खीर खाल्ली तर...

23. मुलांची परीक्षा

24. राजा भिकारी

25. संगतीचा परिणाम

26. संशयी स्वभाव

27. सवय सुटली

28. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ

27. सिंह झाला साधू

30. पंप्या आणि टंप्या

31. सुगरण आणि माकड

32. स्वार्थी मनाचे कारस्थान

33. उपकाराची फेड

34.वाघाचा वाढदिवस

चला रंग भरुया.

नमस्कार !

मुलांना चित्रे काढणे व त्यात रंग भरणे खूपच आवडत असते.पण कमी वयोगट असणारी मुले चित्रे काढू शकत नाहीत. त्यांच्यासाठी तयार चित्रे दिली तर ?
खाली अशाच प्रकारची चित्राची पुस्तके दिली आहेत. एका पुस्तकात भरपूर चित्रे आहेत. फक्त पुस्तकाच्या नावावर क्लिक करा की झाले, पुस्तक डाऊनलोड होईल. त्यातील हव्या त्या चित्राची प्रिंट काढून द्या.


पुस्तक -१ Disney Coloring

पुस्तक-२ Dogs Coloring

पुस्तक-३ Easter Coloring

पुस्तक- ४ Flowers Coloring


























.

संगणकातील कोणताही फोल्डर पासवर्ड प्रोटेक्टेड करणे.

मित्रहो,
       आपण संगणकामध्ये विविध महत्त्वाची माहिती एखाद्या फोल्डरमध्ये जतन करून ठेवतो , पण काही वेळा ही माहिती दुसऱ्याने आपला संगणक ओपन केला तर ती महत्वपूर्ण माहिती ती व्यक्ती पाहू शकते , जर आपला फोल्डर पासवर्ड प्रोटेक्टेड असेल तर दुसरी व्यक्ती ती माहिती पाहू शकत नाही.
       संगणकातील फोल्डर पासवर्ड प्रोटेक्टेड करण्यासाठी खूप पद्धती आहेत , मी एक सोपी पद्धत सांगणार आहे. त्यासाठी आपल्या संगणकात एक software पाहिजे त्याचे नाव winrar आहे जे zip file साठी असते.
       आपल्या PC मध्ये windows ३२ Bit चा असेल तर खालील लिंक वर क्लिक करून १.८८ mb चा software डाऊनलोड करून घ्या.

                                  येथे क्लिक करा

        आपल्या PC मध्ये windows ६४  Bit चा असेल तर खालील लिंक वर क्लिक करून २.०८  mb चा software डाऊनलोड करून घ्या.
                                      येथे क्लिक करा

        हा software आपण filehippo.com वरून फ्री मध्ये डाऊनलोड करू शकतो व डाउन लोड झाल्यावर रन करून इंस्टाल करून घ्या.
१.आता कोणत्याही drive मध्ये किंवा desktop एक फोल्डर तयार करा , त्या मध्ये आपल्या महत्वपूर्ण file पेस्ट करा किंवा जुना फोल्डर असेल असेल तर त्याच्यावर right क्लिक करा.
२.आता एक पॉप ऑप विंडो ओपन होईल त्याच्या मध्ये Add to archive…. असा पर्याय असेल त्याच्यावर क्लिक करा .
३.आता परत एक पॉप ऑप विंडो ओपन त्यातील पहिला आडवा पर्याय General वर क्लिक करा त्यातील उजव्या बाजूला खाली set password असा पर्याय असेल त्याच्यावर क्लिक करा.
४.आता enter password साठी नवीन विंडो ओपन होईल त्यात दोन वेळा पासवर्ड टाका व डाव्या बाजूस खाली ok वर क्लिक करा.
५.परत एकदा आलेल्या पॉप ऑप विंडो मध्ये खाली ok वर क्लिक करा .
६.आता आपल्या फोल्डर ची zip file तयार होण्यासाठी प्रक्रिया साधारण १ ते दीड मिनिटात पूर्ण होईल.
७.आपण ज्या ठिकाणी फोल्डर तयार केला होता तेथे त्या फोल्डर दोन फोल्डर होतात आपण जुना फोल्डर डिलीट करायचा आहे आणि जो winrar चा zip फाईल मध्ये फोल्डर तयार झाला असेल तो तसाच ठेवा.
८.आपण जेव्हा ही zip file ओपन करू तेव्हा आपला जुना फोल्डर दिसेल.
९.आपल्याला त्यातील कोणतीही file ओपन करायची असेल तेव्हा आपण सेट केलेला पासवर्ड मागेल जेव्हा ok वर क्लिक करू तेव्हाच ती file ओपन होईल.
१०.दुसऱ्या व्यक्तीला पासवर्ड माहिती नसल्यास तो त्या फोल्डर मधील कोणतीही file ओपन करू शकत नाही.
           अशा प्रकारे आपण खूप सोप्या पद्धतीने संगणकातील कोणताही फोल्डर पासवर्ड प्रोटेक्टेड करू शकतो.

धन्यवाद !!
( साभार - प्रदिप पाटील पनवेल , रायगड मोबाईल क्र. ९२२२०२३९४७
)

You tube वरील videos कसे डाउनलोड करावेत ?

You tube वरील videos डाउनलोड करण्यासाठी कोणतेही सॉफ्टवेयर, add ins अथवा web site ची गरज भासणार नाही. you tube वरील video डाउनलोड करा अगदी कांही क्लीकमध्ये...
you tube वरील video जेंव्हा आपण प्ले करतो तेंव्हा browser वर वरच्या बाजुला म्हणजे आपण ज्या ठिकाणी web अड्रेस टाइप करतो त्या ठिकाणी (अड्रेस बार) सदर video चा एक लिंक दिसत असते जसे की...

https://www.youtube.com/watch?v=Jbn39j-xa-k

वरील प्रमाणे लिंक दिसेल यामध्ये थोडसं बदल केला की video डाउनलोड होईल.

पद्धत :- 1 (Method 1)
वर सांगितल्या प्रमाणे लिंक मध्ये काय बदल करायच पहा.
मूळ लिंक-
https://www.youtube.com/watch?v=Jbn39j-xa-k

आता यामध्ये youtube समोर "ss" add केला की तयार झाला डायरेक्ट लिंक जसे की..
तयार झालेला नवीन लिंक-
https://www.ssyoutube.com/watch?v=Jbn39j-xa-k

पद्धत :- 2 (Method 2)

मूळ लिंक-
https://www.youtube.com/watch?v=Jbn39j-xa-k

वरील लिंक मध्ये youtube समोर फक्त "dl" add करा जसे की...

तयार झालेला लिंक-
https://www.dlyoutube.com/watch?v=Jbn39j-xa-k

पद्धत :-3 (Method 3)
मूळ लिंक-
https://www.youtube.com/watch?v=Jbn39j-xa-k

यामध्ये youtube च्या अगोदर फक्त "save" add करा जसे की...

नवीन लिंक-
https://www.saveyoutube.com/watch?v=Jbn39j-xa-k

पद्धत :-4 (Method 4)

मूळ लिंक:-
https://www.youtube.com/watch?v=Jbn39j-xa-k

यामध्ये https://www. काढून youtube समोर pwn ठेवा जसे की...

नवीन लिंक:-
pwnyoutube.com/watch?v=Jbn39j-xa-k

पद्धत :-5 (Method 5)
मूळ लिंक-
https://www.youtube.com/watch?v=Jbn39j-xa-k

यामध्ये youtube समोर kick लिहा जसे की...

नवीन लिंक:-
https://www.kickyoutube.com/watch?v=Jbn39j-xa-k

पद्धत :-6 (Method 6)

मूळ लिंक-
https://www.youtube.com/watch?v=Jbn39j-xa-k

      यामध्ये youtube काढा त्याठिकाणी फक्त "deturl"
टाइप करा जसे की...

नवीन लिंक-
https://www.deturl.com/watch?v=Jbn39j-xa-k